शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस, काेराेनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी वैनगंगा असून, यासाेबतच कन्हान सूर, बावनथडी आणि चूलबंद नदी वाहते. दरवर्षी या नद्यांच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसताे. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून, जिल्ह्यात संजय सराेवर, सिरपूर, पुजारीटाेली, कालीसराड आणि इटियाडाेह प्रकल्पातून अतिरिक्त पाणी पावसाळ्यात साेडण्यात येत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण हाेते. यंदा प्रशासनाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणेला सज्ज केले आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाची जय्यत तयारी : गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी ताज्या

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगेला आलेल्या महापुराने हाहाकार उडाला हाेता. काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले हाेते. गतवर्षीचा महापुराचा अनुभव लक्षात घेता, यंदा पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी वैनगंगा असून, यासाेबतच कन्हान सूर, बावनथडी आणि चूलबंद नदी वाहते. दरवर्षी या नद्यांच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसताे. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून, जिल्ह्यात संजय सराेवर, सिरपूर, पुजारीटाेली, कालीसराड आणि इटियाडाेह प्रकल्पातून अतिरिक्त पाणी पावसाळ्यात साेडण्यात येत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण हाेते. यंदा प्रशासनाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणेला सज्ज केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. पुराचा फटका बसणाऱ्या गावांचा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दाैरा करून सद्यस्थितीची माहिती गाेळा करण्यात आली आहे. यासाेबतच फायरफायटर, अग्नीशमन दल, बाेटी तयार ठेवण्यात आले आहे. गतवर्षी झालेल्या महापुरात अनेक गावांना फटका बसला हाेता. शेकडाे हेक्टर पीक महापुरात वाहून गेले हाेते. भंडारा शहरही जलमय झाले हाेते. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे.

पुरबाधित क्षेत्र

भंडारा जिल्ह्यातील १५४ गावांना पुराचा फटका बसताे. त्यात भंडारा तालुक्यातील ३८, माेहाडी १७, तुमसर २४, पवनी ३३, साकाेली ०३, लाखांदूर २८ आणि लाखनी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावरील ९९ चुलबंद ३१, सूर ११, कन्हान ४ आणि बावनथडी नदीच्या तिरावर ९ गावे आहेत. भंडारा तालुक्यातील अर्जुनी, काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, माेहाडी तालुक्यातील मुंढरी, ढिवरवाडा, घाटकुराेडा, तुमसर तालुक्यातील तामसवाडी, परसवाडा, पवनी तालुक्यातील पवना, जुनाेना, सावरगाव या गावांचा संपर्क तुटताे.

अग्नीशमन दल सज्ज

-  भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास अग्नीशमन दलाची मदत घेतली जाते. भंडारा, तुमसर, साकाेली नगर परिषदेच्या अग्नीशमन दल मदतीला धावून येते. यासाेबतच आयुध निर्माणी कारखान्याचे अग्नीशमन दलही मदतीला असते.-  राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून पूरपरिस्थितीत बचाव कशा करावा याचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. भंडारा येथील वैनगंगा नदीपात्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.-  टाकावू वस्तूपासून पूरपरिस्थितीत बचावासाठी कशा उपयाेग करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याच्या रिकाम्या बाॅटलपासून लाईफ सेव्हिंग डिवाईस तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

शहरातील धाेकादायक इमारती, धाेकादायक झाडे

भंडारा नगर परिषदेअंतर्गत २१ धाेकादायक ईमारती आहेत. या सर्व ईमारतींना नगर परिषदेच्यावतीने नाेटीस बजावण्यात आले आहे. तसेच सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.नदी तिरावरील गावांमध्येही अनेक घरे धाेकादायक स्थितीत आहेत. पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक गावांमध्ये अशी धाेकादायक गावे असून त्यांनाही प्रशासनाने सतर्क केले आहे.जिल्ह्यातील राज्य मार्गासह शहरात विविध ठिकाणी ब्रिटीशकालीन वृक्ष आहेत. जिर्ण झालेले हे वृक्ष पावसाळ्यात केव्हाही काेसळू शकतात. नगर परिषदेच्यावतीने अशा वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.

गतवर्षी महापुराची स्थिती पाहता यावर्षी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. पुराचा फटका बसणाऱ्या गावांमध्ये विविध उपाययाेजना केल्या जात आहे. तसेच नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर