शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगा

By admin | Updated: February 26, 2016 00:49 IST

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी (एन.डी.ए.) करिता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड व्हावी याकरिता राज्य शासनाने औरंगाबाद येथे सर्व्हीसेस प्रिपे्रटरी इन्स्टिट्युटची स्थापना केली आहे.

लोकमत युवा नेक्स्टचा कार्यक्रम : कर्नल जे.एस. रावत यांचे प्रतिपादन भंडारा : नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी (एन.डी.ए.) करिता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड व्हावी याकरिता राज्य शासनाने औरंगाबाद येथे सर्व्हीसेस प्रिपे्रटरी इन्स्टिट्युटची स्थापना केली आहे. औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेत विद्यार्थ्यांना दहावीनंतर प्रवेश दिला जातो. एनडीएची तयारी कशी करायची? यासाठी औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेत प्रशिक्षण घेता येते. या संस्थेच्या माध्यमातून संरक्षण सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारून देशाची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त कर्नल जे.एस. रावत यांनी केले. लोकमत युवा नेक्स्ट व डिफेन्स सर्व्हीसेस अ‍ॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन एनडीए या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर म्हणाले, एनडीएमध्ये प्रवेश, अभ्यासक्रम, केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शिक्षण, नोकरी व उच्च अधिकारी बनण्याकरिता वैयक्तिक क्षमता याबद्दल माहिती दिली. सोबतच बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी खडकवासला पुणेमार्फत संरक्षण सेवेत उच्च अधिकारी पदावर जाण्याची संधी आहे. एनडीएमध्ये निवड झाल्यास पदवीचे बी.ई., बी.टेक, बी.एस्सीचे नि:शुल्क शिक्षण भारत सरकार करते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये सबलेफ्टनंट, कॅप्टन अशा पदावर निवड होऊन लाखो रूपयांची नोकरी मिळू शकते. एनडीएबद्दल मार्गदर्शन देणारी विदर्भातील एकमेव संस्था म्हणून डिफेन्स सर्वीसेस अ‍ॅकेडमी विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेत अधिकारी बनण्यासाठी सहकार्य करेल, असे सांगितले. यावेळी मंचावर प्रा.सुनिल महांकाळ, मेजर अंकुश कटरे, ट्रेनिंग आॅफीसर युवराज टेंभरे व प्रा.वंदना लुटे, युवा नेक्स्टचे संयोजक ललित घाटबांधे उपस्थित होते. यावेळी डिफेन्स सर्व्हीसेस अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)