शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आयपीपीईद्वारे ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण

By admin | Updated: October 1, 2015 00:48 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आयपीपीई-२ चे पंचायत समिती भंडाराद्वारे बीपीटी पथकाचे ..

बीपीटी प्रशिक्षण : कोथुर्णा,सोनुली,सिरसी,इंदुरखा ग्रामपंचायतींचे पथकांकडून प्रात्यक्षिकजवाहरनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आयपीपीई-२ चे पंचायत समिती भंडाराद्वारे बीपीटी पथकाचे पाच दिवसीय प्रशिक्षण ग्रामपंचायत गणेशपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पंचायत समिती सदस्य अस्मिता चव्हाण, प्रमिला लांजेवार, मंजुषा जगनाडे, वर्षा साकुरे उपस्थित होते. यात प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक कृषी सेवक, तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, मग्रारोहयोमध्ये काम करणाऱ्या गतवर्षी १०० दिवस पुर्ण करणारे कुटूंबातील सुशिक्षित मजुर, एस.सी. एस.टी. कुटूंबातील नोंदकृत सुशिक्षित मजुर व महिला बचत गटामधील महिला प्रतिनिधी यांचा समावेश होता. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर, नायब तहसिलदार सी.टी. तेलंग, विस्तार अधिकारी (पंचायत) प्रमोद हुमणे, शाखा अभियंता यु.एच. ढेंगे एन.आर.एल.एम.चे तालुका समन्वयक प्रशांत बिलवणे हे होते. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्याचे सन २०१६-१७ चे वार्षिक नियोजन, एन.आर.एल.एम. सर्वेक्षण, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थीचे सर्वेक्षण, मग्रारोहयो अंतर्गत १०० दिवस काम पूर्ण करणाऱ्या कुटूंबातील १८ ते ३५ वयोगटातील प्रत्येक पात्र युवक युवतीसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय, कौशल्य वृद्धी योजने सर्वेक्षण, राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्य योजना कुटुंबाचे सर्वेक्षण याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यासंबंधी प्रात्यक्षिक म्हणून तालुक्यातील कोथुर्णा, सोनुली, सिरसी, इंदुरखा या ग्रामपंचायतीचे आयपीपीई-२ अंतर्गत बीपीटी, पथकाकडून निवडक सर्वेक्षण करण्यात आले. प्रास्ताविक मंजुषा ठवकर यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले यांनी केले. यशस्वीतेसाठी सहायक कार्यक्रम अधिकारी कार्तिक नंदेश्वर, स्थापत्य अभियांत्रिक सहायक डी.एच. चहांदे, प्रविण भिवगडे, गणेश कांबळे, गजानन भजे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)