शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी नर्सेसच्या आंदोलनाकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व भंडारा जिल्हा आयटकचे सचिव  हिवराज उके, लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम व युनियनच्या सचिव मनीषा तीतिरमारे करीत आहेत. आंदोलनाचा आज १३वा दिवस आहे. वारंवार निवेदने देऊनही शासन प्रशासन निवेदनाचा  पाठपुरावा करण्यापलीकडे काहीच करीत नाही.  आमदार व खासदार आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही आंदोलनाच्या पेंडालला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखवत नाही ही आश्चर्याचीच  बाब आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीत  स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या व १३ जुलैपासून कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी नर्सेस (आरोग्य सेविका) यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी २५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व भंडारा जिल्हा आयटकचे सचिव  हिवराज उके, लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम व युनियनच्या सचिव मनीषा तीतिरमारे करीत आहेत. आंदोलनाचा आज १३वा दिवस आहे. वारंवार निवेदने देऊनही शासन प्रशासन निवेदनाचा  पाठपुरावा करण्यापलीकडे काहीच करीत नाही.  आमदार व खासदार आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही आंदोलनाच्या पेंडालला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखवत नाही ही आश्चर्याचीच  बाब आहे. कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने निधी देणे बंद केल्याने राज्य सरकार सुमारे पंधरा हजार लोकांना कामावरून कमी करत आहे. शासनाचा  वरील निर्णय हा बेरोजगारी वाढवणारा व आत्मघातकी असल्याने त्याचा निषेध करण्यात येत आहे. कंत्राटी नर्सेससोबतच इतर सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने राज्यातील आरोग्य खात्यात रिक्त असलेल्या जागेची पदभरती करून व कोरोनाचा  संभाव्य वाढता धोका व प्रादुर्भाव लक्षात  घेता आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी  सर्व कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी.  अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, याची शासन प्रशासनाने  नोंद घ्यावी असे हिवराज उके यांनी कळविले आहे.

तीन लाख पदे रिक्त - राज्यात सुमारे तीन लाख पदे रिक्त असून, ती पदे शासन स्तरावर भरण्यापेक्षा हे सर्व पदे आउटसोर्सिंग ने खासगी कंपन्यांमार्फत भरणार असल्याचे जाहीर केले. तसेच निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. रिक्त पदांची मोठी संख्या असताना पद भरताना कार्य केलेल्या कंत्राटी कर्मचारी यांना नेहमी डावलले जाते. प्रशिक्षीत कर्मचारी वगळता अकुशल कर्मचाऱ्यांचा भरणा केला जातो.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन