शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता चार दिवसात झाला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देगोसे पुनर्वसन विभागाचा पुढाकार । बॅक वॉटरने अडला होता रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने गणेशपूर स्मशानभूमी रस्ता पाण्याखाली आला होता. अंत्यसंस्कारासाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर गोसे पुनर्वसन विभागाने याची दखल घेतली आणि चार दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. यामुळे गणेशपुरच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सदर काम तात्काळ केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला. त्यासाठीच १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. याची दखल घेत गोसे पुनर्वसन विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता अवघ्या चार दिवसात तयार करण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.समस्या मार्गीगोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने शेतशिवाराचे रस्ते बंद झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत गोसे प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढून नवीन रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक