शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अतिक्रमण उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:01 IST

राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.

ठळक मुद्देशंभरावर दुकाने हटविली : शहरात अनेकांनी स्वत:च काढले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने याविरूद्ध मोहीम हाती घेतली. दोन दिवसांपासून सायकल-रिक्षावर ध्वनीक्षेपक लावून अतिक्रमण हटविण्यासंदर्भात दवंडी देण्यात आली होती.शुक्रवारी प्रत्येक्ष अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात प्रशासनाचा बुलडोजर पोहचला. नगरपरिषद, बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी याठिकाणी बुलडोजर घेवून हजर झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचे पथकही तैणात करण्यता आले. सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत मुजबीपर्यंत शंभरावर अतिक्रमण हटविण्यात आले. व्यवसायीकांनी अतिक्रमण हटविताना कोणताही विरोध केला नाही. उलट प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे महामार्गावरील मोहिमेत दिसून आले.राष्ट्रीय महामार्गासोबतच शहरातही नगरपरिषदेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. शास्त्री चौकात या मोहिमेला प्रारंभ झाला. परंतु व्यवसायीकांनी रात्रीच आपले अतिक्रमण या ठिकाणावरून हटविल्याचे दिसून आले. शहरातील सुमारे ३०० अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून नेल्याचे दिसत होते. तसेच अतिक्रमण हटाव पथक दिसताच अनेकांनी आपले हातगाडे व छोटे दुकाने गुंडाळून नेले. जिल्हा परिषद चौक परिसरात अनेक व्यवसायीकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहे. त्यांनीही आपली दुकाने स्वत:हून काढण्याचे दिसत होते.या मोहिमेत महामार्ग प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, नगरपरिषद सहभागी झाली होती.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाचे ५० कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची ४० जणांचे पथक तैणात करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, तहसीलदार अक्षय पोयाम यांनीही या मोहिमेत भाग घेतला. शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत होते. आता आणखी दोन दिवस ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे.तीन दिवस सुरू राहणार मोहीमभंडारा शहरात शुक्रवारी सुरू झालेली ही मोहीम तीन दिवस सुरू राहणार आहे. या दरम्यान अतिक्रमण हटविले जाणार आहे. परंतु अतिक्रमण हटविल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खात्री कुणीही देत नव्हते. रस्ते मोकळे झाले असले तरी ही मोहीम शांत झाले की पुन्हा हे अतिक्रमण वाढणार हे निश्चित.महामार्गावर अतिक्रमण अजामीनपात्र गुन्हाराष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास कारावासही होवू शकतो. परंतु अनेकदा लहान व्यवसायीक असल्याने प्रशासन असे टोकाचे पाऊल उचलत नाही. परिणामी अतिक्रमण वाढत जाते.