मुलाला वाचविताना डॉक्टरांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:50+5:30

डॉ. हारोडे हे त्यांचा मुलगा परेशसोबत पूजाविधीसाठी पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर गेले होते. मुलगा पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेला. त्यामुळे तो पाण्यात कोसळताच त्याला वाचविण्यासाठी हारोडे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता. ते निमा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

Doctor drowned while rescuing child | मुलाला वाचविताना डॉक्टरांचा बुडून मृत्यू

मुलाला वाचविताना डॉक्टरांचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देपवनीची घटना : पुजाविधीसाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : पूजाविधीसाठी सोबत गेलेल्या मुलाला पाण्यातून वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या लाखनी येथील डॉक्टराचा बुडून मृत्यू झाला. डॉ. लीलाधर भीमराव हारोडे रा. लाखनी असे मृत डॉक्टराचे नाव आहे. ही घटना पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर शुक्रवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
डॉ. हारोडे हे त्यांचा मुलगा परेशसोबत पूजाविधीसाठी पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर गेले होते. मुलगा पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेला. त्यामुळे तो पाण्यात कोसळताच त्याला वाचविण्यासाठी हारोडे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता. ते निमा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेने लाखनीसह वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Web Title: Doctor drowned while rescuing child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू