शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा विळखा अन् कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क असणे अनिवार्य आदी नियम घालून दिले.

ठळक मुद्देनियम पायदळी : उद्रेक झाल्यावर सांभाळणार काय?, पालिका प्रशासनाची कारवाई सुरुच

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वारूळातून मुंग्या निघाव्या, तशी स्थिती शहरातील अतिक्रमणाची झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम कोरोना संक्रमणाच्या काळात थंडी पडली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने २३४ चा टप्पा ओलांडल्यानंतरही नागरिक प्रतिबंधात्मक आदेश पायदळी तुडवीत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर अतिक्रमणाला पुन्हा खतपाणी मिळत असून त्यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क असणे अनिवार्य आदी नियम घालून दिले. मात्र याला बहुतांश ठिकाणी हरताळ फासल्याचे दिसून येते. दर दिवशी पालिका कर्मचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारावा लागतो. त्यानंतरही स्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचारी निघून गेल्यावर ‘जैसे थे’ अशी स्थिती असते. आम्ही कुणाचेही ऐकणार नाही, असाच अविर्भाव जणू पाहायला मिळत आहे.

टॅक्स भरूनही दिलासा नाही
फेरीवाले, हातठेलेचालक यासह अन्य किरकोळ दुकानदारांना त्यांच्या हक्काची जागा व दुकान उपलब्ध करून देण्यात येईल, असा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र गाळे तयार असतानाही त्याचे अजुनही वाटप झाले नाही. मोठ्या बाजारातून बसस्थानकाकडे जाणाºया रस्त्याची अक्षरश: वाट लागली असून १२ फुटाचा रस्ता पाच फुटाचा बनला आहे. येथे व्यापाऱ्यांना स्वत:चेच वाहन आतमध्ये आणायला जीकरिचे जात आहे. आम्ही टॅक्स भरूनही पालिका प्रशासन अतिक्रमण धारकांना बळ देत असेल तर टॅक्स भरून उपयोग तरी काय, असा सवाल व्यापारी विचारीत आहेत. अशीच स्थिती खातरोड मार्गाची दिसून येत आहे. रेल्वे लाईन ते म्हाडा कॉलोनीकडे जाणाºया रस्त्याच्या डाव्या साईडला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींना व पालिका पदाधिकाºयांना हे दिसत नसावेत तर नवलच.

भंडारा शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. फारच आवश्यकता असेल तर घरातून बाहेर पडा. विणाकारण घराबाहेर जाऊ नका. आवश्यकता असल्यास मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे पुर्णपणे पालन करा. व्यवसायीकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कर्मचारी घरोघरी जावुन सर्व्हेक्षण करीत आहे, त्यांना खरी माहिती द्यावी जेणेकरुन टारगेट व फोकस करुन भविष्यकालीन उपाययोजना करता येईल.
- विनोद जाधव,
मुख्याधिकारी, नगरपरिषद भंडारा

टॅग्स :Marketबाजार