शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोरोनारुग्ण शतकाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी भेट देत क्वारंटाईन असलेल्या इसमांचीही विचारपूस करण्यात आली.

ठळक मुद्देबाधितांची एकूण संख्या ९८ वर : ७९ बाधित झाले कोरोनामुक्त, मंगळवारी मोहाडीत आढळला पुन्हा एक रूग्ण

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊन कालावधीला १०६ दिवस पूर्ण होत असताना भंडारा जिल्ह्यात कोरोनारूग्णांचा ग्राफही वाढत आहे. कोरोना बाधितांची वाटचाल शतकाकडे होत असून आतापर्यंत ९८ रूग्ण आढळले आहेत. २७ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळल्यानंतर ७० दिवसांच्या कालावधीत ९७ रूग्ण आढळले. दुसरीकडे रूग्ण बरे होण्याची टक्केवारीही ८१ इतकी आहे. आतापर्यंत ७९ कोविड रूग्णांना सुटी देण्यात आली आहे.प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी भेट देत क्वारंटाईन असलेल्या इसमांचीही विचारपूस करण्यात आली.कोविड रुग्ण आढळलेल्या दिवसनिहाय आकडेवारीवर नजर घातल्यास गत ६९ दिवसातच ९८ रुग्ण आढळले आहेत. २७ एप्रिलनंतर १७ मे रोजी २ रुग्ण आढळले. त्यानंतर १९, २४ व २६ मे रोजी प्रत्येकी चार रुग्ण आढळले. २८ मे रोजी ५ रुग्ण आढळल्यानंतर एकुण कोविड रुग्णांची संख्या २४ वर पोहचली. त्यानंतर २ जून रोजी ७ रुग्ण आढळल्याने एकुण संख्या ३८ वर पोहचली. १० जून रोजी सहा तर त्यानंतर १७ जूनला पाच रुग्ण आढळले.सर्वात जास्त रुग्ण म्हणजे १९ जून रोजी १३ कोरोनाबाधित आढळले. यावेळी एकुण बाधितांची संख्या ७१ वर पोहचली. २० जून रोजी चार, २२ व २५ रोजी प्रत्येकी दोन तर २९ जूनला एक रुग्ण आढळला. जुलै महिन्यात एक तारखेला सात, ४ जुलै रोजी सहा तर ६ जुलै रोजी चार रुग्ण आढळल्यानंतर बाधितांची संख्या ९७ इतकी झाली. मंगळवारी मोहाडी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. सदर व्यक्ती २२ वर्षीय असून तो मुंबई येथून आल्याचे सांगण्यात आले. सातही तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ३०५ व्यक्ती भरती असून ३ हजार ८१२ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.तसेच फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्रश्वासदाहचे एकूण १६७ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. यापैकी सर्वांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून १६४ नमुणे निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल अप्राप्त आहे.परराज्यातून आलेल्यांमुळे वाढले रुग्णपुणे, मुंबई व इतर राज्यातून ४४ हजार ६३३ व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. त्यापैकी ४१ हजार ४२४ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. आताही अन्य राज्यातून आलेल्या ३ हजार २०९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य व अन्य राज्यातून आलेल्या व्यक्तींमुळेच जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.कन्टेन्मेंट झोनमध्ये ही गावेजिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने भंडारा तालुक्यातील खोकरला आणि साकोली तालुक्यातील धर्मापुरी कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. धर्मापुरी येथे कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले असून कुंभली, सावरबांध ही दोन गावे बफरक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,६९९ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी ९८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४४०७ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर १९४ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या