शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संचारबंदीचा एसटीला दररोज ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचारबंदी जारी झाली. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला झाला आहे. केवळ २२ प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेवळ आठ बसेस सुरू : दीड हजार किलोमीटर चालून रोजचे उत्पन्न ३० हजार

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचे पुन्हा एकदा चाक थांबले आहे. कोरोना संचारबंदीच्या काळात परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाला दररोज ३५ लाखांचा फटका बसत आहे. सध्या सुरू असलेल्या ८ बसेसच्या माध्यमातून महामंडळाला रोज २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पहिल्या लाॅकडाऊनपेक्षाही यावेळी स्थिती गंभीर झाल्याचे दिसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचारबंदी जारी झाली. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला झाला आहे. केवळ २२ प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने २२ प्रवासीही मिळणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत केवळ ८ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यात भंडारा-नागपूर आणि गोंदिया - नागपूर यासह तिरोडा मार्गावर एक बस धावते. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगाराचे भारमान ५८ वरून २९ पर्यंत खाली आले आहे. प्रवासीच मिळत नसल्याने बसेस बंद आहेत. चालक आणि वाहकांना एक दिवस आड ड्युटी दिली जाते. एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये तर तीन महिने पगारच झाला नव्हता. यावेळी मार्च महिन्याचा कसाबसा पगार झाला, परंतु एप्रिल महिन्यात पगार होतो की नाही, अशी शंका राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आहे. लोकवाहिनी म्हणून एसटी बसची ओळख आहे. ग्रामीण असो की शहरी प्रवासासाठी एसटी बसचाच आधार घ्यावा लागतो. परंतु कोरोना संसर्गापासून एसटी महामंडळ डबघाईस आले आहे. गत वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून एसटी महामंडळाला कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत आहे. आता तर कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने प्रवाशांनीच बसकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. भंडारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट असतो. काही मोजके प्रवासी सोडले तर एसटीचेच अधिकारी आणि कर्मचारी बसस्थानकावर दिसून येतात. बसस्थानकाशी संबंधित व्यवसायालाही फटका बसला आहे.

सोमवारचे उत्पन्न ३० हजार रुपयेदररोज ३६ ते ३७ लाख उत्पन्न मिळविणाऱ्या भंडारा विभागाला सोमवारी निच्चांकी उत्पन्न झाले. १,५३३ किलोमीटर बस धावल्यानंतर महामंडळाला केवळ ३० हजार रुपये मिळाले. विशेष म्हणजे, आठवड्याचा पहिला दिवस असतानाही निच्चांकी उत्पन्न मिळाले. कोरोना संसर्गामुळे एसटी कडे पाठ फिरविली असून, सर्व बस स्थानकावरही शुकशुकाट दिसून येत आहे. 

राज्य परिवहन महामंडळाला संचारबंदीचा मोठा फटका बसत आहे. उत्पन्न ठप्प झाले असून, शिवशाही बसही बंद आहे. एसटीचे पर किलोमीटर अर्निंग २२ रुपयांवरून १५ रुपयापर्यंत खाली आले आहे. या संकटाच्या काळात एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर आहे. -डाॅ. चंद्रकांत वडस्कर,  विभागीय वाहतूक अधिकारी

 

टॅग्स :state transportएसटी