शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना कागदावरच

By admin | Updated: May 1, 2017 00:24 IST

चिचाळ येथील पाणी पुरवठा करणारी जवाहर योजनेतील सन १९८४ मधील पाईल पाईन जिर्ण झाल्याने जलकुंभात पाण्याची साठवणुक होत नाही.

चिचाळात पाणी समस्या पेटणार : जुनी नळ योजना कालबाह्य, जीवन प्राधिकरण योजनेला अपयशप्रकाश हातेल चिचाळचिचाळ येथील पाणी पुरवठा करणारी जवाहर योजनेतील सन १९८४ मधील पाईल पाईन जिर्ण झाल्याने जलकुंभात पाण्याची साठवणुक होत नाही. पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने ११ गावाला जीवन प्राधीकरण योजनेंतर्गत पाणी पुरवठा करणारी योजना अपयशी ठरल्याने जलकुंभ शोभेचे वास्तू म्हणून उभे आहेत. १२ महिन्यापूर्वी गावाला शासनाची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर असुनही कागदावरच असल्याने या वर्षाला पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जिवन प्राधीकरण विभागाच्या हलगर्जीपणा व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत ११ गावांना पाणी पुरवठा करणारी योजना अपयशी ठरल्याने पवनी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका चिचाळ गावाला बसला आहे. जिवन प्राधीकरणच्या माध्यमातून चिचाळ, आकोट, कोंढा कोसरा, ब्राम्हणी, शिवनाळा, जुनोना, भेंडाळा, मांगली, वलनी व कुर्झा या ११ गावांना पाणी पुरवठा करणारी योजना यंदाही अपयशी ठरल्याने ती योजना थंडबस्त्यात पडली आहे. सध्या भूजलस्तर खालावल्याने विहिरी बोरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.पवनी तालुक्यातील ग्राम चिचाळ येथे जीवन प्राधिकरण योजनेतील २ लाख लिटर पाण्याची टाकी मागील १५ वर्षापासून उभी असून यंदा वर्षालाही ती कोरडीच राहिल्याने चिचाळ ग्रामवासीयांना जवाहर योजनेतील जुनी ६५ हजार लिटरची पाण्याची टाकीच पाणी पुरवठा करीत आहे. चिचाळ येथील साधन सामुग्री अल्पशी असल्याने पाण्याची समस्याग्रस्त नागरिकांना दहाही दिशा भटकंती करावी लागत आहे.ग्राम चिचाळ येथे शेत शिवारात ८१ विहिरी गावात ५९ खाजगी विहिरी २५ बोरवेल द्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने नळ योजनेचे पाणी पुरवठा दिवसातून एकदाच केल्या जातो. सदर गावाला जीवन प्राधिकरणाचे मोठे जलकुंभ उभे असून कोरडेच आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतने जलकुंभाशेजारी बोरवेल मारुन पाणी साठविले जाते. मात्र गावातील जिर्ण पाईप लाईन ने ग्रामस्थांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. सदर गावाला भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नळाचे पाणी १५ ते २० मिनिटे मिळते. त्यामुळे येथील काही धनाढ्य श्रीमंतानी पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून टिल्लू पंप खरेदी करुन घरगुती कनेक्शनवर लावले आहेत. त्यामुळे त्यांना पाणी जास्त प्रमाणात मिळते.पंपाच्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याने सखल भागात २४ तास नळात पाणी राहायचे. आता काही वेळापुरतेच पाणी राहते. सदर प्रकरणासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतला तक्रारी केल्या ग्रामपंचायतने धाडी मारल्या मात्र काही दिवस बंद केल्या जाता व पूर्वत जैसे थे स्थिती होत आहे.सदर गावाला पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. येथे मुख्यमंत्री पेयजल योजना ६० लक्ष रुपयांची मंजूर असून या योजनेला प्रत्येक कार्यक्रमात लोकप्रतिनिधीनी मी आणल्याचे श्रेय लाटून घेतले मात्र वर्ष लोटूनही ही योजना चिचाळ ग्रामस्थांना पाणी पाजण्यास अपयशी ठरल्याने चिचाळ ग्रामपंचायतने मुख्यमंत्री यांना निवेदन देवून ती योजना तात्काळ चालू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.सन १९८४ मधील पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जिर्ण झाली तर जीवन प्राधीकरण पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने गावाला पाणी समस्येचा सामना करावा लागतो. मात्र मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर असून ती योजना पुर्णत्वास गेल्यास पाणी समस्या मिटेल.उषा काटेखायेसरपंचा, ग्रामपंचायत चिचाळ