बंदीजनांच्या हस्तकला, कौशल्याचे मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:50+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात बंदीजनी सागवान लाकडापासून अनेक गृहपयोगी साहित्य, वस्तू तयार केल्या आहेत. स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी एस.वाय पाटील, पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी सी.एम. कदम, आर.एन. ठाकरे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.

Captive crafts, skills marketing | बंदीजनांच्या हस्तकला, कौशल्याचे मार्केटिंग

बंदीजनांच्या हस्तकला, कौशल्याचे मार्केटिंग

Next
ठळक मुद्देस्टॉलचे उद्घाटन : गृहोपयोगी साहित्य, वस्तू विक्रीसाठी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कारागृह प्रशासनाने ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत बंदीजनांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. त्याअनुषंगाने कैद्यांच्या हातून तयार झालेल्या गृहपयोगी साहित्य, वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती कारागृहाने दिवाळीचे औचित्य साधून स्टॉलचे उद्घाटन येथील जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या हस्ते सोमवारी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात बंदीजनी सागवान लाकडापासून अनेक गृहपयोगी साहित्य, वस्तू तयार केल्या आहेत. स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी एस.वाय पाटील, पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी सी.एम. कदम, आर.एन. ठाकरे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते. साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल कारागृह परिसरातील चांदूर रेल्वे मार्गावर साकारण्यात आले आहे. बंदीजनाच्या हातून निर्मित सागवान लाकडापासून विविध शोभेच्या वस्तू, फर्निचर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. तसेच खास दिवाळीसाठी शाडू मातीच्या लक्ष्मी मुर्ती, आकाशकंदील विक्रीसाठी आहेत. सागवान टी पॉट, स्टुल, आराम खुर्ची, देवारा, सागवान दीक्षाभूमी, सतरंजी, की-चेन, कासव पानपुडा, उदबत्ती स्टॅन्ड अशा एक ना अनेक गृहपयोगी साहित्य विक्रीसाठी आहेत. या वस्तू, साहित्य विक्रीतून येणारे उत्पन्नातून बंदीजनांना रोजगार मिळणार आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील कारखाना विभागामार्फत हे स्टॉल लावण्यात आले आहे.

Web Title: Captive crafts, skills marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग