शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

बीटीबीतर्फे नागरिकांना मोफत भाजीपाला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : संचारबंदीच्या काळात सामाजिक जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूच्या विरोधात प्रशासकीय पातळीवर लढाई सुरु असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा काळात सर्वसामान्यांना अडचणीचे जाऊ नये म्हणून येथील बीटीबी सब्जीमंडीच्या वतीने शहरात मोफत भाजीपाला वितरण करण्यात येत आहे. सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविला जात आहे.संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला.तत्पूर्वी बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी प्रशासनाला भाजीपाला उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. परंतु प्रशासन इतर कामात व्यस्त असल्याने बीटीबीनेच स्वत: पुढाकार घेत भंडारा शहरातील गल्लोगल्ली भाजीचे वितरण सुरु केले आहे.संचारबंदीमुळे व्यापारी येत नसल्याने मंडीतील भाजीपाल्याला उठाव नाही. भाजीपाला लवकर नष्ट होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सामाजिक भान ठेवून हा भाजीपाला मोफत वितरीत केला जात आहे. भंडारा शहरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकजण मदतीचा हात देत आहेत. महानगरातून गावाकडे स्थलांतरीत करणाऱ्या मजुरांसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी असलेल्या बेघरांनाही शासनाच्या मदतीने वसतिगृहात दाखल करण्यात आले आहे.समाजसेवेच्या भावनेतून मोफत भाजीपाला वाटपाचे नियोजन केले आहे. बीटीबी सब्जीमंडी असोसिएशनच्या वतीने शक्य तेवढा भाजीपाला गरजूपर्यंत पोहचविला जाईल. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्यातीलच हा एक उपक्रम होय.-बंडू बारापात्रे,अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक