शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा तालुक्यात १३८१ मेट्रिक टन खत पोहोचले बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वयं बियाण्याची उगवण क्षमता तपासावी : २२५ हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत २१० शेतकरी गटातील शेतकऱ्यांना एक हजार ३८१ मेट्रीक टन खते बांधावर पोहोच करण्यात कृषी विभागाला यश आले.
भंडारा तालुक्यातील पहेला व भंडारा अंतर्गत विविध शेतकरी गटानी कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोच करण्यात आली. पेरणीपुर्वी शेतकऱ्यांनी करावयाच्या बिज प्रक्रिया तसेच विविध प्रात्याक्षिकांची माहिती देण्यात येत आहे. तालुक्यातील खरबी येथील वाडीभस्मे कृषी केंद्रातून परसोडी व पेवठा येथील भाग्यश्री बचत गटाला बियाणे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी योगेश वासनिक, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, कृषी सहायक रेणुका दराडे, हेमा टिचकुले यांच्या उपस्थितीत पोहोच करण्यात आली. त्यानंतर शहापूर, ठाणा आणी खरबी येथील कृषी केंद्राची पाहणी करुन आढावा घेतला.
तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात भंडारा मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी, शहापूर, गणेशपूर, भंडारा, मोहदूरा, खुर्शीपार, साहूली, माटोरा, कोंढी, तर पहेला मंडळ कार्यालयांतर्गत बोरगाव, वाकेश्वर पहेला, भिलेवाडा, आमगाव, मानेगाव, धारगाव, कोका मुख्यालयी शेतकरी गटामार्फत बियाणे पोहोच करण्यात आले आहे.
आतापर्यंत १८ शेतकरी गटामार्फत १३५ शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

पेरणीसाठी घाई करु नका
भंडारा तालुक्यात सर्वाधिक धान, सोयाबीन, कापूस पिकाचे क्षेत्र असल्याने शेतकºयांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणीला सुरुवात करु नये, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती बियाण्यांचा वापर करीत बिज प्रक्रिया करावी. पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती