शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांचे आंदोलन चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात धान उत्पादनासह जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात.

ठळक मुद्देकोट्यवधींचे चुकारे अडले : आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक संस्था पडल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचे अनेक महिन्यांपासूनच कोट्यवधींचे चुकारे अडविल्याने संस्था व दूध उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुधाचे देयक तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. थकीत देयक मिळण्यासाठी सर्व संस्थांचे पदाधिकारी एकवटल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.भंडारा जिल्ह्यात धान उत्पादनासह जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय सुमारे ४०० कोटींच्या घरात आहे. एकट्या भंडारा जिल्हा दूध संघाचा व्यवसाय हा १०० कोटींचा आहे. जिल्ह्यात ३५० दूध संस्था असून या संस्था जिल्हा दूध संघाला दुधाचा पुरवठा करतात.जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जिल्हा दूध संघाने अचानकपणे एप्रिल २०१९ पासून दूध संस्था व शेतकऱ्यांचे देयक अडवून ठेवले आहे.संस्थांचे देयक अडविल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या अनेक लहान संस्था बंद पडल्या आहेत. परंतु, त्यांचे देयक अदा करण्यात आले नाही. या संस्थांचे १६० दिवस अर्थात १६ आठवड्यांचे देयक तातडीने देण्यात यावे, यासाठी दूध संघाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शेकडो संस्थाचालकांनी संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांच्या नेतृत्वात दूध संघाला घेराव घातला होता. परंतु, त्यातूनही काहीच साध्य न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाणार आहे. तरीसुद्धा देयके न मिळाल्यास दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे. आता कधी चुकारे वाटप केले जाते, याकडे गोपालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :milkदूध