शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२५ दिवसांच्या उपचारानंतर बिबट झाला बरा !

By admin | Updated: December 1, 2014 22:48 IST

गडेगाव लाकूड आगार येथे मागील २५ दिवसांपासुन उपचार घेत असलेला जखमी बिबट आज उपचारमुक्त झाला आहे. त्याच्या जखमा भरलेल्या आहेत. त्यामुळे या बिबटाला आता जंगलात किंवा प्राणी

साकोली : गडेगाव लाकूड आगार येथे मागील २५ दिवसांपासुन उपचार घेत असलेला जखमी बिबट आज उपचारमुक्त झाला आहे. त्याच्या जखमा भरलेल्या आहेत. त्यामुळे या बिबटाला आता जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात सोडता येवू शकते असा अहवाल पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी काल दि. ३० रोजी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आता या विषयाला सोडण्यासाठी आदेशाची प्रतिक्षा आहे. या बिबट्याची कडेकोट सुरक्षा कायम आहे.
साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील वृध्द महिलेला ठार करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने दि. ५ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. त्यानंतर या बिबट्याला रात्रीच गडेगाव आगार येथे आणण्यात आले. तेव्हापासून या बिबट्यावर पिंजऱ्यातच औषधोपचार सुरु असून वनविभागाच्या देखरेखीत आहे.
बऱ्याच दिवसापासून एकाच ठिकाणी जेरबंद असल्याने या बिबट्याजवळ कुणी गेल्यास तो चवताळून पिंजऱ्यावर डोके आढळायचा. यात आधीच पायाने जखमी असलेल्या बिबट्याच्या डोक्यानाही जखम झाली. ही गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला इतरत्र हलविणे अडचणीचे झाले होते.
हा बिबट जेरबदं होण्याआधीच पायाला दुखापत असल्याने त्याची तीन नखे गळून पडली होती. त्याठिकाणी पु झाला होता. त्यामुळे त्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याने आपला मोर्चा गावाकडे वळविला असावा असा वनअधिकाऱ्याचा कयास आहे. या बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्या पायाची इजा लक्षात आली व पायावरील जखमेवर औषधोपचार करीत असतानाच पुन्हा डोक्यावर झालेल्या जखमेमुळे वनअधिकारी व कर्मचाऱ्याचीही झोप उडाली होती. या दोन्ही जखमा दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याचा सुरक्षेची मोठी जबाबदारी वनकर्मचाऱ्याकडे होती. (तालुका प्रतिनिधी)