शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेत ६.६७ लाखांचा गैरव्यवहार!

By admin | Updated: October 17, 2016 00:29 IST

विविध कार्यकारी सेवा संस्थांतर्गत चार नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे.

गटसचिवाविरुध्द गुन्हा दाखल : साकोली तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थाभंडारा : विविध कार्यकारी सेवा संस्थांतर्गत चार नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परिक्षक व निबंधक सहकारी संस्था यांच्या लेखी तक्रारीवरुन गटसचिव उमेश सदाशिव लंजे याच्या विरुध्द साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील पाच वर्षांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी चौकशी सुरु होती. याअंतर्गत विविध कार्यकारी सेवा संस्था अंतर्गत सरकारी संस्थांमधील पैशाची अफरातफर केल्याचे म्हटले जात होते. यासंदर्भात १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत गटसचिव पदावर असलेल्या उमेश लंजे यांनी सरकारी संस्थांतर्गत येत असलेल्या रेंगेपार, सातलवाडा, मोखे व किन्ही येथील विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये उपरोक्त रकमेची अफरातफर केली. नियमाला डावलून हेतुपुरस्सर विश्वासघात केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. या संदर्भात चारही संस्थामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची वा अफरातफरीची लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था साकोली व जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था भंडारा यांच्याकडे रामभाऊ कारेमोरे रा. साकोली यांनी केली होती. या अनुषंगाने तपास सुरु होता. तपासाअंती व सहकारी संस्थेच्या अहवालावरुन उमेश लंजे याने चारही संस्थांमधून ६ लक्ष ६७ हजार ४९५ रुपयांची अफरातफर केल्याची लेखी तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. यामध्ये रेंगेपार संस्थेतून १ लक्ष १३ हजार २६० रूपये, सातलवाडा येथील संस्थेतून २ लक्ष ५२ हजार ८५८ रूपये, किन्ही यथील संस्थेतून २ लक्ष ५६ हजार ८६८ तर मोखे येथील संस्थेतून ४४ हजार ५०९ रूपयांची अफरातफर केल्याचे उघडकीला आले आहे.तक्रारीहून साकोली पोलिसांनी भांदविच्या ४०९ कलमान्वये उमेश लंजे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तपासी अधिकारी एपीआय गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणात अजून कोणते मासे गळाला लागतात याकडे तालुकावासींयाचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. के. गावंडे करीत आहेत. (प्रतिनिधी)