शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो.

ठळक मुद्देनळधारकांकडे ३५ लाख थकीत : भंडारात नळधारकांची संख्या १३ हजारावर, भंडारा दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अपव्यय होतो. यातून नगरपरिषदेचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून सर्वसामान्यांना दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतो.भंडारा शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये पाणी सोडून नागरिकांना पाणी वितरित केले जाते. भंडारा शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९१ हजार ८४५ आहे. नगरपरिषदेने शहरातील १३ हजार २१० नागरिकांना नळ जोडण्यात दिल्या आहे. यावरून नागरिकांची तहाण भागविली जाते. तर शहरातील १२५ ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले आहे. नळासाठी एकही अर्ज सध्या नगरपरिषदेत प्रलंबित नाही.शहराला दररोज किमान ४५ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील साधारणत: १५ टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईपलाईन फुटल्याने होते. भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र ही योजना कार्यान्वीत झाली नसल्याने नागरिकांना जुन्याच पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. शहरात पाणी टंचाईची समस्या नसली तरी दूषीत पाण्याची समस्या मात्र भीषण आहे. यासाठी नगरपरिषदेचे शहरात १८ ठिकाणी आॅरो प्लाँट उभारले आहे. परंतु त्याचा पुरेसा उपयोगच नागरिक घेत नाही.पाणी पुरवठ्याची यंत्रणा हाताळण्यासाठी नगरपरिषदेचे दरवर्षी एक कोटी ४४ लाख ६५ हजार रूपये खर्च येतो. तर वीज बिलावर ८४ लाख २५ हजार रूपयांचा खर्च होतो. पाईपलाईन दुरूस्ती व इतर कामांसाठी ६० लाख ४० हजार रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग पाणी कर, आणि पाणी बिल वसुलीसाठी पुरेसे प्रयत्न करीत असले तरी नळधारक त्याला प्रतिसाद देत नाही. सध्या नळधारकांकडे ३५ लाख सात लाख ५०४ रूपयांचे बिल थकीत आहे. नगरपरिषदेने यासाठी मोहीम राबवून वसुली सुरु केली आहे.शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र येत्या काही दिवसातच पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. लवकरच शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईल.- प्रवीण गणवीर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग.शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शहराच्या विविध भागात सार्वजनिक नळ, हातपंपाची संख्या अधिक असल्याने पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा.

टॅग्स :water shortageपाणीकपात