शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या बोनसचे 223 कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. हमी भाव १८६८ आणि बोनसचे ७०० रुपये असे २५६८ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला धान पणन महासंघाला विकला. १ लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धान विकला आहे. या धानाची हमी भावानुसार किमत ७०० कोटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून प्रतीक्षा : १ लाख २७ हजार शेतकऱ्यांचे ३७ लाख क्विंटल धान

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जिल्ह्यातील १ लाख २७ हजार शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या माध्यामातून विकलेल्या ३७ लाख क्विंटल धानाच्या बोनसचे तब्बल २२३ कोटी २० लाख रुपये शासनाकडे थकीत आहे. सहा महिने झाले तरी शासकीय पातळीवर कुठल्याच हालचाली दिसत नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत. बियाणे आणि खते कशी खरेदी करावी असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. हमी भाव १८६८ आणि बोनसचे ७०० रुपये असे २५६८ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला धान पणन महासंघाला विकला. १ लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धान विकला आहे. या धानाची हमी भावानुसार किमत ७०० कोटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये आहे. यापैकी ७०० कोटी ६७ लाख १४ हजार ३२ रुपयाचे चुकारे करण्यात आले आहेत. तर ६ लाख ९६ हजार ३२२ रुपयांचे चुकारे हमी भावानुसार थकीत आहेत. आत या विकलेल्या धानाची बोनसपोटी रक्कम २२३ कोटी २० लाख रुपये आहे. सहा महिने झाले तरी अद्यापही बोनस देण्यात आला नाही.खरीप हंगाम तोंडावर असताना आर्थिक चणचण भासत आहे. शेतकरी चातकासारखे बोनसची वाट बघत आहे. हाती पैसा नसल्याने बी बियाणे खरेदीला अडचण आलेली आहे. अधिवेशनापूर्वीच ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करणारे आज गप्प बसले आहेत. शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम शासन करीत आहे. शेतकऱ्यांचे नेते सुद्धा अपेक्षित प्रयत्न करीत नसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे.  जिल्ह्यातील मोठे पुढारी अर्थात लोकप्रतिनिधी प्रामाणिक नेते प्रयत्न केल्यास निश्चितच बोनस तात्काळ मिळू शकतो. मात्र तुर्तास बोनससाठी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न आहे. 

कोरोना संसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले- कोरोना महामारीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कंबरडे मोडलेले असताना शासनाने सुद्धा मदतीचा हात दिला नाही.   मान्सूनपूर्व पावसाची हजेरी सर्वदूर लागत आहे. पेरणीची तयारी शेतकरी करीत आहे. परंतु पैसाच नसल्याने शेतकरी कृषी केंद्रात केवळ चौकशी करून बोनसच्या रकमेची वाट पाहत आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी