विजया एकादशी २०२६: प्रयत्नांना लाभेल उपासनेचे बळ! जाणून घ्या प्रभू रामांनी केलेल्या या व्रताचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:21 IST2026-02-12T16:20:26+5:302026-02-12T16:21:47+5:30

Vijaya Ekadashi 2026: १३ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी आहे, तुमच्या अडलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी हे व्रत जरूर करावे, वाचा महत्त्व!

Vijaya Ekadashi 2026: Efforts will be rewarded with the power of worship! Know the importance of this fast observed by Lord Rama | विजया एकादशी २०२६: प्रयत्नांना लाभेल उपासनेचे बळ! जाणून घ्या प्रभू रामांनी केलेल्या या व्रताचे महत्त्व

विजया एकादशी २०२६: प्रयत्नांना लाभेल उपासनेचे बळ! जाणून घ्या प्रभू रामांनी केलेल्या या व्रताचे महत्त्व

भारतीय संस्कृतीमध्ये एकादशीला 'व्रतांची जननी' मानले जाते. वर्षातून येणाऱ्या २४ एकादशींपैकी माघ कृष्ण एकादशीचे विशेष महत्त्व आहे, जिला आपण 'विजया एकादशी(Vijaya Ekadashi 2026) म्हणून ओळखतो. यंदा शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी हा शुभ योग जुळून आला आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात 'विजय' मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते.

माघ विजया एकादशी २०२६: कसे कराल व्रतपूजन? कालातीत विजय होईल, श्रीविष्णूंची अपार कृपा लाभेल!

प्रभू श्रीराम आणि विजया एकादशीची कथा

या एकादशीचे महात्म्य प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाशी जोडलेले आहे. जेव्हा सीतामाईच्या शोधात प्रभू राम लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा अफाट समुद्र ओलांडणे आणि रावणाच्या शक्तिशाली आसुरी सेनेचा पराभव करणे हे मोठे आव्हान होते.

त्यावेळी बक दाल्भ्य ऋषींच्या मार्गदर्शनानुसार, प्रभू रामांनी आपल्या वानरसेनेसह विधीवत 'विजया एकादशी'चे व्रत केले. या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे आणि दृढ संकल्पामुळे प्रभू रामांना रावणावर विजय मिळवणे सुलभ झाले. म्हणूनच कठीण प्रसंगात यश मिळवण्यासाठी हे व्रत 'रामबाण' मानले जाते.

एकादशी व्रताचा मूळ हेतू: देहापेक्षा देवाकडे ओढ

एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, तर तो मनावर ताबा मिळवण्याचा एक सराव आहे.

इंद्रिय निग्रह: आपल्या शारीरिक गरजा कधीही न संपणाऱ्या आहेत. उपवासाच्या माध्यमातून देहाची आसक्ती कमी करून मनाला सन्मार्गी लावणे, हा या व्रताचा मुख्य हेतू आहे.

हरिनाम संकीर्तन: जेव्हा आपण शरीराच्या गरजांना गौण मानतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण हरीनामात तल्लीन होऊ शकतो.

उपासाचे स्वरूप: हे व्रत केवळ एकभुक्त नसून, दोन्ही वेळ फलाहार करून किंवा निर्जळी राहून मनाला शिस्त लावण्याचे साधन आहे.

Shani Pradosh 2026: व्हॅलेंटाईन डेला लाल नाही, तर 'हा' रंग उघडेल भाग्याची दारे; शनि प्रदोषाला दुहेरी आशीर्वाद!

स्पर्धात्मक युगात 'विजया' एकादशीची गरज

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यश हवे आहे. इथे एक प्रश्न उपस्थित होतो की, "केवळ व्रत करून लढाई जिंकता येते का?" याचे उत्तर असे की— केवळ प्रयत्नांनी यश मिळतेच असे नाही, तर त्या प्रयत्नांना उपासनेच्या बळाची जोड लागते.

१. मानसिक आधार: विजया एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला एक आंतरिक 'मनोबल' प्राप्त होते. 
२. प्रतिकूलतेवर जय: जेव्हा मन शांत आणि स्थिर असते, तेव्हाच आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. 
३. ताणतणाव मुक्ती: उपवास आणि भक्तीमुळे मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे कामात एकाग्रता वाढते.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला ९९% लोक करतात ही चूक; संसारी लोकांनी टाळा 'ही' कृती!

Web Title : विजया एकादशी २०२६: सफलता के लिए उपासना की शक्ति!

Web Summary : विजया एकादशी, १३ फरवरी को, विजय प्राप्त करने के लिए महत्वपूर्ण है। भगवान राम की तरह, भक्ति के साथ यह व्रत करने से चुनौतियों पर काबू पाने में मदद मिलती है। यह इच्छाओं को नियंत्रित करने, आध्यात्मिकता पर ध्यान केंद्रित करने और आज की प्रतिस्पर्धी दुनिया में मानसिक शक्ति प्राप्त करने के बारे में है, जिससे ध्यान बढ़ता है और तनाव कम होता है।

Web Title : Vijaya Ekadashi 2026: Power of faith for success!

Web Summary : Vijaya Ekadashi, on February 13th, is significant for achieving victory. Like Lord Rama, observing this fast with devotion helps overcome challenges. It's about controlling desires, focusing on spirituality, and gaining mental strength in today's competitive world, enhancing focus and reducing stress.