शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: नोकरी, आरोग्य की रिलेशनशिप? या आठवड्यात कोणत्या क्षेत्रात होणार प्रगती? पाहा टॅरो कार्ड्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 07:00 IST

Tarot Card: टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून तीनपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि नंबरप्रमाणे मार्गदर्शन वाचा.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१५ ते २१ फेब्रुवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा! 

 नंबर १: 

वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एखाद्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. घरी परत येणे किंवा घरापासून दूर जाणे असे प्रवास संभवतात!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. कुटुंब की करिअर असा पर्याय तुमच्या समोर येऊ शकतो त्यामुळे मानसिक अस्वस्थता वाटेल!
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा महत्वाचा टप्पा समोर दिसेल. त्याबाबत शंका असल्यास पूर्ण ज्ञान करून घ्या आणि मगच निर्णय घ्या.
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत संभ्रम आणि शंका येण्याचा संभव आहे. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शांत वेळ घ्या आणि विचार करा!
शिक्षण/परीक्षा - अभ्यास करताना अभ्यास कमी आणि विचार जास्त असं होऊ शकतं. त्यामुळे लक्ष अभ्यासात ठेवा. परदेशात जाण्याच्या परीक्षेत चांगली अनुकूलता मिळेल!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात दुरून एखादी वस्तू मागवायची असल्यास चांगले परिणाम मिळतील.
कोर्ट कचेरी - या बाबतीत अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुम्हाला तुमची बाजू कशी मांडायची आहे याबाबत देखील काही निर्णय घ्यावे लागतील!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल. विशेष करुन उष्णता डोकेदुखी पित्ताचे त्रास अपचन यांचे त्रास वाढतील असे कुपथ्य करु नका!
प्रवास -  प्रवास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. विशेष करुन नोकरी शिक्षण व्यवसाय निमित्त दूरवरचा किंवा परदेशी प्रवास असता चांगले परिणाम मिळतील!

नंबर २: 

वैयक्तिक आयुष्य - घरात वादाचे प्रसंग येऊन त्याचा अतिविचार केला जाईल. किरकोळ भांडणे होऊन नात्यात वितुष्ट संभवते!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता. मनासारखे घडणार नाही त्यामुळे त्रास होऊ शकतो!
फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादी फसवणूक संभवते त्यामुळे आता नवीन गुंतवणूक नको!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता. एकमेकांना समजून घ्या, योग्य संवादातून मार्ग निघणार!
शिक्षण/परीक्षा - स्पर्धा किंवा परीक्षेच्या बाबतीत अती श्रमामुळे ताण येण्याची शक्यता आहे. एकटे पडल्यासारखे वाटेल. हवं ते यश मिळणे अवघड जाईल!
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात नुसते विचार आणि संभ्रम निर्माण होतील पण प्रत्यक्षात घडून यायला आणखी काही वेळ लागेल!
कोर्ट कचेरी - एखादा निकाल मनासारखा लागणार नाही, विलंब होईल किंवा त्रासदायक घटना घडेल! हा काळ संयमाची परीक्षा बघणारा!
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, विशेष करुन मान पाठ कंबर डोळे आणि डोकेदुखी या बाबतीत दुर्लक्ष करु नका!
प्रवास - अती जास्त दगदग टाळणे हिताचे ठरेल, सगळ्या गोष्टी नियोजित घडणार नाहीत याचा त्रास करुन घेऊ नका!

नंबर ३: 

वैयक्तिक आयुष्य - घरात तुम्ही किंवा कुणी ज्येष्ठ महिला यांच्यावर जास्त जबाबदारी पाडण्याची शक्यता आहे. ती स्वीकारून चोख काम करण्याची ही वेळ आहे!
नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुमच्या हातात बरीच ताकद असणार आहे. त्याचा वापर करा आणि योग्य ती सुधारणा करा. अजिबात मागेपुढे न पाहता चोख निर्णय घ्या!
फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमचे निर्णय योग्य झालेले आहेत. आता येणारा पैसा चांगल्या प्रकारे वापरा आणि दुरुपयोग किंवा अवाजवी खर्च टाळा!
रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुम्ही स्वतः रुसवे सोडून पुढे व्हा. तुमच्या जोडीदाराला खरे बोलून, गैरसमज मिटवून, बुद्धिचातुर्य वापरून खुश करा!
शिक्षण/परीक्षा - बुद्धी वापरण्याची ही वेळ आहे. पाठांतर करण्यापेक्षा अभ्यास समजून लक्षात ठेवा. परीक्षेत साध्या सोप्या टिप्सचा उपयोग करा.
खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुमचे स्पष्ट बोलणे कामास येईल. नको वाटत असेल तर स्पष्ट नकार द्या. लोकांचे मन जपण्यासाठी काहीही करू नका!
कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सत्याच्या बाजूने निर्णय लागेल. तुमचे संवाद कौशल्य आणि परखड मत मांडणे कामाला येईल! फसवाफसवी नको!
आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. अतिविचार करण्याचे टाळा. चाकू सुरी विळी कात्री इत्यादी टोकदार वस्तू हाताळताना अधिक काळजी घ्या.
प्रवास - प्रवास चांगले होतील. ठरल्याप्रमाणे सारे काही वेळेत घडण्याची शक्यता आहे.

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.
ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarot Card Reading: Career, Health, or Relationship Progress This Week?

Web Summary : Weekly tarot guidance (Feb 15-21) offers insights into personal life, career, finance, relationships, education, property, legal matters, health, and travel based on chosen number. Choose wisely for guidance.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य