शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणात सोळा सोमवारचे व्रत का सुरू करतात त्याची कथा व पूजाविधीसह सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 1:15 PM

Shravan Somvar 2021 Vrat: हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात. 

येत्या ९ ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे आणि यंदा श्रावणी सोमवारच्या दिवशी श्रावणाचा आरंभ होत आहे. त्यामुळे पाच श्रावण सोमवार मिळणार आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सोळा सोमवार व्रताचे महत्त्व!

सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यापैकी कुणीही ते करू शकतात. हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात. 

सोळा सोमवार पूजा विधी व नैवेद्य 

या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात. मग अळणी पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा रोटल्याचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात. एका भागाचा नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे.

सतराव्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणाराने तिथे महापूजा करायची असते. त्यामद्ये सुवर्णचंपक, बेल, कमळ, बकुळ आणि पन्नग ही फुले आवश्यक असतात. यासाठी जो प्रसाद करावयाचा असतो त्यात पाच शेर कणीक, सव्वाशेर तूप आणि सव्वाशेर गूळ यांचे रोट करून ते गोवऱ्यांवर भाजतात. त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात. एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग आप्तेष्टांना भोजनप्रसंगी वाटतात, या वेळी सोळा ब्राह्मण मेहुणांनाही भोजन प्रसादास बोलवायचे असते. इष्टकामनापूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते.

सोळा सोमवार व्रताची कथा 

विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते. तेथे एक शिवालय होते. बागबगीचा, तळे असा त्याचा सुंदर आसमंत होता. एकदा शिव पार्वती तेथून जात असतात त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व तेथे ते द्यूत खेळले. तयातील `पण' कुणी जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला. तेथे असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्याचा निर्णय देण्यास सांगितले. त्याने शिवाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शाप दिला. त्यामुळे तो रोगी झाला.

पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. देवलाने ते केले. त्यामुळे तो रोगमुक्त झाला.नंतर शिव पार्वती परत तेथे एकदा आले. देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने त्याला काय उपचार केला, असे विचारले तेव्हा त्याने केलेल्या सोळा सोमवार व्रताची हकीगत तिला सांगितली.

पुढे एकदा पार्वतीवर रागावून तिचा मुलगा षडानन निघून गेला. खूप शोध केला तरी तो सापडेना. तेव्हा पार्वतीने सोळा सोमवारचे व्रत केले. षडानन तिला येऊन भेटला. सोळा सोमवार व्रताच्या अशा आणखीन काही कथा आहेत. 

असे हे व्रत रोगातून, पापातून मुक्ती देणारे आहे, तसेच अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ती होण्यासाठीदेखील हे व्रत करतात. तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला लागा... 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल