शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Navratri 2020 : नवरात्रीत करा सप्तशतीमधील सिद्धमंत्रांचे पठण, भक्तिमय होईल वातावरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:02 AM

Navratri 2020: सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो.

ठळक मुद्देसप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत.या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंत्रोच्चारामुळे सकारात्मकता वाढते, म्हणून मंत्रांचे नित्यपठण करावे.

नवरात्रीत भक्तीचा जागर करण्यासाठी आपण सगळेच सज्ज झालो आहोत. या प्रचंड नकारात्मक वातावरणात गरज आहे, सकारात्मकतेची पेरणी करण्याची. येत्या नऊ दिवसांत नऊ प्रकारच्या धान्याबरोबर नऊ सकारात्मक विचारांचीदेखील आपण रुजवण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संकल्पला परिपूर्णता येण्यासाठी आणि विश्वावर आलेले संकट दूर होण्यासाठी 'सप्तशती'मधील सिद्धमंत्रांचा नक्कीच उपयोग होईल. 

सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. म्हणून तर, सहस्रावर्तन असो किंवा सहस्रजप, हे संकल्प सिद्धीस जावेत, म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही नवरात्रीच्या निमित्ताने एकत्रितरित्या या सिद्धमंत्रांचा अवलंब करू आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या आदि शक्तीला हे वैश्विक संकट दूर करण्याची प्रार्थना करू. 

हेही वाचा: Navratra 2020: घटस्थापना कशी करतात? नवरात्रीत कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ते जाणून घेऊ

सप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमदभगवतीच्या कृपेचा महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे, असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

मंत्रांचे उच्चार वातावरणनिर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनिअम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेल रचनांची भर पडते, त्याप्रमाणे भगवन्नाम घेत असताना स्तोत्रपठण तसेच मंत्रोच्चारण यामुळे योग्य परिणाम साधला जातो. जीभेला चांगले वळण लागते. सकारात्मकता वाढते,म्हणून मंत्रांचे नित्यपठण करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठण करूया.

इत्थं यदा यदा बाधा, दानवोत्था भविष्यति,तदा तदावतिर्यादं करिष्याम्यरिसंक्षयम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य,दस्थुतो वा न राजत:न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्संभविष्यति।।

ऐं ऱ्हीम क्लीं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम् रक्षोभूतशिाचानां पठनादेव नाशनम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं मम प्रभावास्हिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा,दूरादेव पलायन्ते स्मरनश्चरितं मम् ।।

दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके,मम सिद्धीमसिद्ध वा स्वप्ने सर्व प्रदर्शय।।

या मंत्रजपांचे नित्यपारायण करावे.हे मंत्रोच्चार कठीण वाटत असले, तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता, येत्या नवरात्रीत रोज स्नान करून, शुचिर्भुत होऊन, आसनस्थ होऊन उपरोक्त मंत्रपठण करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही, तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर, असे मागणे मागावे. जगदंबsss  उदयोस्तु!

हेही वाचा: Navratri 2020: १७ ऑक्टोबरपासून नवरात्रीचा जागर; ३० नोव्हेंबरपर्यंत येणाऱ्या मोठ्या पर्वाची माहिती एका क्लिकवर

टॅग्स :Navratriनवरात्री