Haldi Kunku Ukhane: हळदी-कुंकू समारंभ स्पेशल उखाणे: झटकन पाठ होतील आणि ऐकताच सगळे कान टवकारतील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:42 IST2026-01-17T16:40:08+5:302026-01-17T16:42:18+5:30

Haldi Kunku Special Ukhane in Marathi: यंदा १४ ते २५ जानेवारी अर्थात मकर संक्रांति ते रथसप्तमी या काळात घरोघरी हळदीकुंकू समारंभ होतील, त्यात या उखाण्यांनी तुमची छाप पाडा!

Haldi Kumku Ukhane: Haldi-Kumku ceremony special Ukhane; You will learn it in no time and everyone will be amazed as soon as you hear it. | Haldi Kunku Ukhane: हळदी-कुंकू समारंभ स्पेशल उखाणे: झटकन पाठ होतील आणि ऐकताच सगळे कान टवकारतील 

Haldi Kunku Ukhane: हळदी-कुंकू समारंभ स्पेशल उखाणे: झटकन पाठ होतील आणि ऐकताच सगळे कान टवकारतील 

पूर्वी मकर संक्रांती(Makar Sankranti 2026) किंवा सण, वार, पूजेला उखाणे घेणं म्हणजे नवऱ्याचे नाव घेण्याची संधी मिळणं. आता नवऱ्याला नावाने हाक मारण्याची पद्धत रूढ झाली तरी उखाण्यातले नाव ऐकायला सगळेच कान टवकारतात. आयत्या वेळी उखाणे लक्षात राहत नाहीत, त्यामुळे मोजके उखाणे पाठ करून ठेवायचे आणि वेळ, काळ, प्रसंगानुसार त्यात सण, वार बदलून खणखणीत आवाजात उखाणे घ्यायचे. तुमचा उत्साह, आत्मविश्वास आणि शब्दांची सुरेख गुंफण उपस्थित सगळ्यांवरच तुमची छाप पाडेल हे नक्की!

हळदी-कुंकवाच्या सोहळ्याला जमल्या साऱ्या जणी, ...रावांच्या आयुष्यात मी आहे त्यांची राणी 

टपोरा मोगरा फुलला छान, ....रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान!

पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा, .....रावांचे नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा! 

लग्नानंतरची पहिली संक्रांत, लुटते मी वाण, ...रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान

संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, .....रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा!

तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा, ......रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना मकर संक्रांती सणाच्या शुभेच्छा!

कुंकवाचा करंडा, हळदीची वाटी, ...रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी 

Haldi Kunku Easy Rangoli: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

कळत नाही माझेच मला आहे स्वप्न की भास, .....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास! 

आयुष्याच्या बागेत फुलला प्रेमाचा वेल, ....रावांमुळे माझ्या जीवनात आला आनंदच खेळ. 

इन्स्टाग्रामवर करते रील, लाईक्सचा येतो पाऊस, ....रावांमुळे माझ्या आयुष्यात आहे खूपच हाऊस. 

आई-बाबांच्या मायेनंतर लाभली सासरची प्रेमळ साथ, ...रावांच्या हातात दिला मी आयुष्यभरासाठी हात

गुगलवर शोधते ट्रेंडिंग रेसिपी, ....रावांमुळे माझ्या जीवनाची झाली लाईफ हॅपी. 

गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती ....रावांना दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला विनंती.

कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज ....रावांचं नाव घेते ज्येष्ठागौरीचा सण आज. 

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. 

काळ्या साडीवर शोभतो हलव्याचा साज, ...रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाचा आहे हा रिवाज 

नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आकाश, …..रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश. 

तिळाची केली पोळी, गुळाचा केला रवा... रावांचे नाव घ्यायला, मुहूर्त कशाला हवा?

संक्रांतीच्या सणाला, काळी साडी नेसले... रावांच्या प्रेमासाठी, मी माहेर विसरले.

तीळगुळ घ्या गोड बोला, असे सांगते संक्रांत... रावांचे नाव घेते, सुखी राहो आमचा संसार अत्यंत.

सुगड पूजले वाण दिले, हळदी-कुंकवाचा थाट... रावांचे नाव घेत, धरली संसाराची वाट.

शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, ...रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून

मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्याने बदलली दिशा...रावांचे नाव घ्यायची, कसली एवढी नशा?

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ...रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी

मकर संक्रांतीच्या सणाला, पतंग उडतो आकाशी... रावांचे नाव घेते, खास हळदी-कुंकवाच्या दिवशी.

सासरचे प्रेम आणि माहेरची माया... रावांचे नाव घेताना, कशाला हवी भीतीची छाया?

संक्रांतीच्या लूटमध्ये, वाण दिले चांदीचे...नाव घेते, सौभाग्य लाभले जन्माचे.

हिवाळ्याच्या दिवसात, तिळगुळाचा गोडवा...रावांचे नाव घेते, सर्वांना आमचा संसार आवडावा.

सुवर्णाचे ताट, त्यावर हिऱ्याचा चमचा...वांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा तुमचा.

पतंगाच्या दोरीला मांज्याचा आधार, ...रावांच्या संसारात मी आहे भाग्यवान फार

आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात छान, ...रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

Web Title : हल्दी-कुंकू स्पेशल उखाणे: याद करने में आसान, सुनने में आकर्षक

Web Summary : मराठी महिलाएं पारंपरिक रूप से हल्दी-कुंकू समारोहों के दौरान 'उखाणे' (काव्यात्मक दोहे) का उपयोग करती हैं। ये पति का नाम मज़ाकिया ढंग से लेने का अवसर प्रदान करते हैं। आधुनिक नामकरण प्रथाओं के बावजूद, अच्छी तरह से कहे गए 'उखाणे' एक स्थायी प्रभाव डालते हैं। अवसर के अनुसार अनुकूलित कुछ याद किए गए छंद निश्चित रूप से दर्शकों को मोहित कर लेंगे।

Web Title : Haldi-Kunku Special Ukhane: Easy to Learn, Captivating to Hear

Web Summary : Marathi women traditionally use 'ukhane' (poetic couplets) during Haldi-Kunku ceremonies. These offer a chance to playfully mention the husband's name. Even with modern naming practices, well-delivered 'ukhane' create a lasting impression. A few memorized verses, adapted to the occasion, will surely captivate the audience.