शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:51 IST

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडवा स्त्री वर्गाच्या आवडीचा, कारण त्यादिवशी पतिदेवाकडून हक्काची ओवाळणी घेता येते; पण ही प्रथा सुरु कशी आणि कधी झाली ते पाहू. 

दिवाळीचे(Diwali 2025) पाच दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी असते. एकामागोमाग एक येणारे सण आणि त्याच्या प्रत्येक दिवसाचे आगळे वेगळे महत्त्व, कथा, पूजा, प्रसाद आणि त्या जोडीला दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, नातेवाईकांच्या भेटी गाठी यामुळे हा सण वर्षभर पुरेल एवढा आनंद देऊन जातो. म्हणून आपण दरवर्षी दिवाळीची आतुरतेने वाट पाहतो. पैकी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे सण झाले, आता दिवाळी पाडवा आणि भाऊबीज(Bhai Dooj 2025) हे सण आपण साजरे करणार आहोत. 

Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!

२२ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा (Diwali Padva 2025) आहे. हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात. दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक स्थान आहे. या सणाला आपण बलिप्रतिपदा या नावाने ओळखतो. या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला  औक्षण करते आणि नवरा एखादी भेटवस्तू देतो. पण ही प्रथा कशी निर्माण झाली ते जाणून घेऊ. 

कथा बळीराजाची, त्यातच उपकथा ओवाळणीची 

हिंदू सणांमध्ये बली प्रतिपदा या सणाला फार महत्त्व आहे, कारण आपल्या संस्कृतीत त्यागाचा महत्त्व अधिक आहे आणि बळीराजा हा दैत्य असूनही त्याचे दातृत्त्व अनुकरणीय आहे. त्याच्या नावावरून या दिवसाचे महत्त्व कसे वाढले ते आधी पाहू. 

दैत्यराजा बळी हा नावाप्रमाणे बलवान होता. मात्र तो जसा महाप्रतापी तसाच परमदयाळूदेखील होता. आपल्या प्रजेवर त्याचे अपत्याप्रमाणे प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा हा नातू. 

वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?

या बळीने तपश्चर्या करून त्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्गदेखील जिंकला. त्याने प्रल्हादाला ते स्वर्गाचे राज्य देऊ केले. परंतु प्रल्हादाने बळीलाच राजगादीवर बसवले. त्यावेळी `धर्माने राज्य कर' असा उपदेशही केला. बळीने स्वर्ग जिंकल्याने देव घाबरून आपली रूपे बदलून स्वर्गापासून दूर गेले होते. एवढा हा पराक्रमी होता.

बळीने आपल्या आयुष्यातील शेवटचा अश्वमेध केला त्यावेळी ती संधी साधून इंद्राने विष्णूंना बळीचा बीमोड करण्याची विनंती केली. कारण तो यज्ञ पूर्ण झाला असता त्या यज्ञाच्या पुण्याईने  बळीराजाला इंद्रपद मिळाले असते आणि त्याच्या राज्यात देवांना असुरक्षित वाटले असते. म्हणून भगवंतांनी वामनावतार धारण करून बटुवेषात बळीकडे जाऊन तीन पावले ठेवता येतील एवढी जमीन मागितली. 

Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा

दातृत्वाबद्दल ख्याती असलेल्या बळीने बटूची इच्छा मान्य केली. त्याबरोबर विष्णूने भव्यरूप धारण करून दोन पावलांमध्ये त्रिभूवन व्यापून तिसरे पाऊल बळीच्या सांगण्यावरून त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. मात्र बळीची भक्ती आणि दातृत्व ही तिथी तुझ्या नावाने बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल, असा वर दिला.  बळीच्या प्रजाप्रेमाचे द्योतक म्हणून या दिवशी समाजाभिमुख अशा कार्याचा प्रारंभ केला जातो आणि इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो असे म्हटले जाते.

बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागचे कारण : 

भगवान विष्णुंनी बळी राजाचे गर्वहरण केले, शिवाय त्याच्या दातृत्त्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला, ते पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली. तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णुंचे औक्षण करून स्वागत केले, तेव्हा विष्णुंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्य प्राप्तीचा आशीर्वाद दिला. या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपसुख ऐश्वर्य प्राप्तीचे वरदान मिळते. विष्णु-लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसा प्रत्येक पती पत्नीने एकमेकांचा करावा, या उद्देशाने पाडव्याला नवर्‍याला ओवाळण्याची आणि नवर्‍याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली!

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Padwa: Husband's Gift to Wife - Right or Duty?

Web Summary : Diwali Padwa celebrates Bali's benevolence. Wives honor husbands, reminiscent of Lakshmi honoring Vishnu. Husbands offer gifts, symbolizing prosperity and mutual respect. It is a tradition rooted in mythology.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीrelationshipरिलेशनशिपIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधी