शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:53 IST

Chaitra Purnima 2026: गुरुवार २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा योग जुळून आला आहे, त्यानिमित्ताने गुरुसेवेची 'ही' संधी चुकवू नका!

२ एप्रिल २०२६ रोजी चैत्र पौर्णिमा(Chaitra Purnima 2026) आहे. यंदा ही तिथी गुरुवार आणि हनुमान जयंतीच्या शुभ योगावर आली आहे. तसेच हिंदू नववर्षातील ही पहिला पौर्णिमा आहे. या मुहूर्तावर गुरुसेवा सुरु करावी अशी तुमची इच्छा असेल तर कमी कालावधीत कोणती प्रभावी उपासना करता येईल ते जाणून घ्या. 

चैत्र पौर्णिमा २०२६: १ एप्रिलचा 'हा' १ तास तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवू शकतो; करा दिलेला १ उपाय!

गुरुसेवा म्हटल्यावर पहिले आठवते ते श्री गुरुचरित्र! गुरुभक्त तीन दिवस, सात दिवस पारायण करतात. मात्र तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर श्री गुरुचरित्र  वाचण्याची इच्छा असूनही जर ५२ अध्यायांचे पारायण करणे शक्य नसेल, तर 'एक श्लोकी गुरुचरित्र' हा तुमच्यासाठी एक सिद्ध पर्याय ठरू शकतो.

दत्त संप्रदायामध्ये 'श्री गुरुचरित्र' हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नसून ते 'अमृत' आहे. या ग्रंथाला संजीवनी, कामधेनू आणि सुधारस अशी अनेक विशेषणे दिली गेली आहेत. अनेकदा आपण प्रापंचिक सुखासाठी हे वाचन सुरू करतो, पण वाचता वाचता श्रीगुरूंच्या लीलेत आपण इतके समरस होतो की, मनातील वासना गळून पडतात आणि 'वैराग्य' भाव आपोआप निर्माण होतो.

परंतु, आजच्या धावपळीच्या युगात ७ दिवसांचे किंवा ३ दिवसांचे कडक नियम पाळून पारायण करणे सर्वांनाच जमते असे नाही. अशा वेळी श्रद्धेपोटी तुम्ही 'एक श्लोकी गुरुचरित्र' सेवेचा मार्ग निवडू शकता.

Numerology: तुमच्या मुलांकात दडलंय हनुमानासारखं बळ; करिअर आणि आयुष्यात यश मिळवण्याचं 'हे' आहे गुपित!

काय आहे 'एक श्लोकी गुरुचरित्र'?

श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण ५२ अध्याय आहेत. या ५२ अध्यायांचे संपूर्ण सार केवळ एका श्लोकामध्ये सामावलेले आहे. हा श्लोक म्हणण्यासाठी एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो, मात्र त्याचे फळ संपूर्ण पारायण केल्यासारखेच मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

या सेवेचे अद्भुत लाभ

असे मानले जाते की, जगात अशी कोणतीही समस्या नाही जी दत्तगुरूंच्या चरणी गेल्यावर सुटत नाही. ही सेवा खालील समस्यांवर प्रभावी ठरू शकते:

>> नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी.

>> घरातील सततची भांडणे किंवा आजारपण.

>> नजरदोष, बाह्य बाधा किंवा मानसिक ताण.

>> आर्थिक चणचण आणि प्रलंबित कामे मार्गी लागतात. 

मृत्यूची तारीख सांगणारी विहीर! वाराणसीच्या 'या' विहिरीचे थरकाप उडवणारे रहस्य माहीत आहे का?

चला तर पाहू, एकश्लोकी श्री गुरुचरित्र

दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपादपीठापुरी ॥
त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती कारंजग्रामांतरीं ॥
तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा ॥
तेथुनि मठ गाणगापुरि वसे वारी दीनांच्या श्रमा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

दत्त गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवा

महाराजांची सेवा करताना मनात पूर्ण समर्पण हवे. आपली दुःखे किंवा समस्या नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडे सांगण्यापेक्षा आपल्या गुरूंजवळ सांगा. लोक तुमच्या परिस्थितीवर हसू शकतात, पण तुमचे गुरु तुम्हाला संकटातून नक्कीच बाहेर काढतील. जर तुम्ही पूर्ण शरणागतीने ही सेवा केली, तर एका तासातही प्रचिती येऊ शकते, असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर या एकश्लोकी श्री गुरुचरित्राचे नित्य पठण सुरु करा. श्री दत्त गुरु तुमचे कल्याण करतील. 

टीप : सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chaitra Purnima 2026: Get the merit of complete Gurucharitra in seconds!

Web Summary : Chaitra Purnima 2026 falls on April 2nd. Recite the 'Ek Shloki Gurucharitra' for quick blessings. It solves career, family, health, and financial problems. Believe in Dattaguru for solutions.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय