कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:52+5:302021-05-30T04:26:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनापासून बचावासाठी लोक आता लस घेण्यासाठी पुढे येत आहेत; परंतु ज्यांनी लस घेतली त्यांनी ...

What if Corona made a cocktail of vaccines? | कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनापासून बचावासाठी लोक आता लस घेण्यासाठी पुढे येत आहेत; परंतु ज्यांनी लस घेतली त्यांनी आपण पहिला डोस कोणता घेतला, हेच लक्षात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांनी पहिला वेगळा आणि दुसरा वेगळा डोस घेतल्याची उदाहरणे समोर येत आहेत. दोन वेगवेगळे डोस घेतल्याने कॉकटेल होते. त्यामुळे जो दुसरा डोस घेतला त्यालाच बूस्टर डोस म्हणून तोच डोस घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने पहिला डोस काेणता घेतला, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६७ हजार लोकांनी कोरोना लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ७८ हजार एवढी असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची ८९ हजार आहे. जे लोक वृद्ध अथवा विसरभोळे आहेत, अशांना पहिला डोस कोणता घेतला, हेच माहिती नाही. त्यामुळे वेगवेगळा डोस घेतल्यावर कॉकटेल होते. याच परिणाम वाईट नसला तरी यामुळे पुन्हा वेळ वाया जातो, तसेच केंद्रावर धावपळ करावी लागते.

पहिला डोस वेगळा अन्‌ दुसरा डोस वेगळाच

अंबाजोगाई तालुक्यात एका महिला डॉक्टरने पहिला डोस कोव्हॅक्सिन घेतला होता; परंतु तो आठवणीत न राहिल्याने दुसरा कोविशिल्डचा घेण्यात आला.

ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात येताच त्या महिला डॉक्टरला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २४ तास निगराणीत ठेवले होते.

काय म्हणतात नोडल ऑफिसर

पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतल्याची घटना अंबाजोगाईत घडली होती. संबंधिताला २४ तास निगराणीत ठेवले होते, तसेच पहिला आणि दुसरा वेगवेगळा डोस घेतल्यास कॉकटेल होईल. त्यामुळे नंतर जो दुसरा डोस घेतला, तोच तिसरा बूस्टर डोस घ्यावा. शक्यतो पहिला डोस कोणता होता, हे लक्षात ठेवावे.

-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण, बीड

Web Title: What if Corona made a cocktail of vaccines?