शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:55 IST

न्यायालयाने सूचना देऊनही निवडणूक आयोगाने त्याचे पालन केले नाही; महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप

अंबाजोगाई -: परळी विधानसभा मतदार संघात १२२ बुथवर आराजकता व दहशतीने बोगस मतदान झाले. त्यामुळे या १२२ मतदान केंद्रावर फेर मतदान घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. अशी लेखी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

बुधवारी दिवसभर परळी विधानसभा मतदार संघात धर्मापुरी,जलालपुर,परळी शहरातील बँक कॉलनी येथे बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप स्वतः मी उमेदवार म्हणून घेतला. अशीच स्थिती मतदार संघातील १२२ संवेदनशील मतदार केंद्रांवर आहे. उच्च न्यायालयाने या १२२ मतदान केंद्रांवर सीआरपीएफ बंदोबस्तात व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना केली होती. निवडणूक आयोगाने तसे शपथपत्र ही दिले. मात्र अंमलबजावणी केली नाही. परिणामी दहशत व गुंडागर्दी करत  बोगस मतदानाची प्रक्रिया धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविण्याचा आरोपही देशमुख यांनी केला. 

याउलट न्यायालयात याचिका दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड. माधव जाधव यांना न्यायालयात का गेलात या कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा सर्व प्रकार पोलीस यंत्रनेसमोर होऊनही अद्यापपर्यंत कसलाही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही. घाटनांदुर व परिसरात मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनीच मतदान केंद्रावर धुडगूस घातला. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदविले, असा आरोप करत या घटनेचा निषेध ही देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच या १२२ केंद्रांवर फेर मतदान घेण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड. माधव जाधव, नेत्या सुदामती गुट्टे उपस्थित होत्या.

पोलीस अधीक्षकांची भेट घेऊनही गुन्हा नोंद झाला नाही: ॲड. माधव जाधवमतदार संघातील १२२ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.इथे सिआरपीएफ बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयात केली होती. मात्र याची दखल घेतली नाही. उलट मलाच न्यायालयात का गेलास? म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मतदान केंद्र परिसरात जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पोलिसांसमोर होऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. तरीही गुन्हा नोंद झाला नाही. त्यामुळे गुरुवारी आपण मुख्यमंत्री,गृहमंत्री व पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते ॲड.माधव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे