शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

६५ जनावरे दगावल्यानंतर पशुसंवर्धनचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील जनावरांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतानाच ६ गावांच्या परिसरात गायी-वासरांना घटसर्प आजाराची लागण झाल्याने ...

अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील जनावरांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतानाच ६ गावांच्या परिसरात गायी-वासरांना घटसर्प आजाराची लागण झाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या गावातील लहान मोठी एकूण ६५ जनावरे दगावली असल्याची पुष्टी तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी दिली आहे. तर जनावरांच्या मृत्यूमुळे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मागील ४ ते ५ दिवसांपासून जनावरे मृत्यू पावत आहेत. या जनावरांना घटसर्प या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली लाखो रुपयांची जनावरे डोळ्यासमोर मृत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या गावांना औरंगाबाद येथील प्रादेशिक पशुरोग निदान प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त प्रमोद चौधरी, डॉ. रोहित धुमाळ,डाॅ. वानखेडे यांनी २८ मे रोजी भेट दिल्यानंतर आष्टी पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात करून तत्काळ जलदगतीने काही गावांचे लसीकरण पूर्ण केले आहे, तर काही गावांमध्ये सुरू आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. एकूण ६५ मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने औरंगाबाद व पुणे येथील पशुधन रोग निदान प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगण्यात आले. आमदार सुरेश धस यांनीही घटनेची माहिती मिळताच तत्काळ तवलवाडीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला.

घटसर्प आजाराने बाधित गावे

आष्टी तालुक्यातील तवलवाडी,पांढरी,जामगांव, देवीगव्हाण, वाळुंज, सोलेवाडी या गावातील जनावरे घटसर्प या आजाराने दगावली आहेत. मृत पावलेल्या जनावरांची विल्हेवाट खोल खड्डा खोदून चुना टाकून लावावी. पशुसंवर्धन विभाग या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहे.

पशुधन वाचविण्यासाठी कटिबद्ध

पशुसंवर्धन विभाग आष्टीच्यावतीने पुणे येथून लस उपलब्ध केली असून लसीकरणासाठी बाधित गावांमध्ये पथके तैनात करून लसीकरण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना स्वच्छ चारा, स्वच्छ पाणी पाजावे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आपले पशुधन वाचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

- मंगेश ढेरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, आष्टी.

घटसर्प बाधित गावांमध्ये लसीकरण

घटसर्प आजारामुळे फुफ्फुसदाह होऊन जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन वाळुंज, जामगांव, देविगव्हाण, तवलवाडी परिसरात ४ डाॅक्टरांचे प्रत्येकी १ पथक तैनात केले असून शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून लसीकरण सुरू केले. रविवारपर्यंत लसीकरण पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या गावातील किती जनावरे दगावली

गाव - मोठे - लहान

पांढरी - ०३ - ०२

तवलवाडी ३१ - २३

सोलेवाडी ०२ - ००

देविगव्हाण ०२ - ०१

जामगांव ०१ - ००

एकूण ३९ - २६

-----------------

===Photopath===

290521\img-20210529-wa0324_14.jpg