शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांविरुद्ध फास आवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

गेवराई : तालुक्यात होणारा वाळूचा अवैध उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस आणि महसूल विभाग कामाला लागले असून वाळू माफियांविरुद्ध फास ...

गेवराई : तालुक्यात होणारा वाळूचा अवैध उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस आणि महसूल विभाग कामाला लागले असून वाळू माफियांविरुद्ध फास आवळला जात आहे. सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने तर महसूलच्या पथकाने बागपिंपळगाव परिसरात वाळूसह ट्रक जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळू भरणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला दिसून आले. यावेळी कारवाई करत वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर तर वाळू भरत असताना चार ट्रॅक्टर असे आठ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. हे सर्व ट्रॅक्टर जप्त करून येथील पोलीस ठाण्यात लावण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एस.पी पथकाचे प्रमुख विलास हजारे,मोटे, भिल्लारे, गेवराईचे पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ आदींनी केली.

-------

महसूलच्या पथकाची कारवाई

गेवराई तालुक्यातील बागपिंपळगावकडे अवैध वाळू उपसा करून एक ट्रक येत असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसीलदार सचिन खाडे,तलाठी निकाळजे, तलाठी बाळासाहेब पखाले, सानप, ससाने यांच्या पथकाने सापळा लावला. राष्ट्रीय महामार्ग ५२ वर उभा असलेला ट्रक पकडला. यात अवैधरित्या उपसा केलेली तीन ब्रास वाळू होती. वाळू व ट्रक असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा पकडलेला ट्रक कारवाईसाठी येथील तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.

===Photopath===

120321\20210312_145546_14.jpg

===Caption===

गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या  वाळू  उपसा करणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पकडून  कारवाई केली.