शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 6:37 PM

यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले.

केज : तालुक्यातील युसूफवडगांव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिक्षकाचे घर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी शिक्षकाच्या घरातून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले. तर एका ठिकाणी घरमालक जागी झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षक अशोक दामोदर चौधरी यांचे घर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यापासून १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गेटचे कुलूप तोडून चोरटे घराच्या परिसरात आले. त्यानंतर किचनचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एका खोलीतील कपाट तोडून त्यामधील रोख ३५ हजार रूपये लंपास केले. याबाबत रेखा अशोक चोधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी कुलूप तोडून सोयाबीनचे ९ कट्टे चोरून नेले. तसेच एका घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. गावात मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :theftचोरीBeedबीडCrime Newsगुन्हेगारी