पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परतलीच नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 06:44 PM2022-01-20T18:44:45+5:302022-01-20T18:46:46+5:30

सादोळा रोडच्या कडेला असलेल्या जलवाहिनीवर पाणी आणण्यासाठी गेली होती मुलगी

The 16-year-old girl who went out to fetch water never returned | पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परतलीच नाही 

पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परतलीच नाही 

Next

केज ( बीड ) : पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली एक १६ वर्षीय मुलगी घरी परतली नसल्याची घटना रविवारी ( दि. १६) दुपारी घडली आहे. याप्रकरणी बुधवारी मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, १६ जानेवारी रविवार रोजी दुपारी १२:०० वाजेच्या दरम्यान एक १६ वर्षीय मुलगी घरातून सादोळा रोडच्या कडेला असलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्हवरून पाणी आणण्यासाठी जात असल्याचे सांगून गेली. मात्र, ती पाणी घेऊन घरी परत आली नाही. यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु, ती आढळून आली नाही. या प्रकरणी तिच्या भावाने १९ जानेवारी युसुफवडगाव येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. १५/२०२२ भा.दं.वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पिंपळे हे करीत आहेत.
 

Web Title: The 16-year-old girl who went out to fetch water never returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.