शाळेच्या स्वच्छतेसाठी शिक्षक छतावर चढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:42+5:302021-07-15T04:23:42+5:30

धारूर : तालुक्यातील सोनीमोहा येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताला अचानक गळती लागल्याचे पाहून शाळेचे शिक्षक तानाजी लिसुने यांनी शाळेच्या ...

The teacher climbed to the roof to clean the school | शाळेच्या स्वच्छतेसाठी शिक्षक छतावर चढले

शाळेच्या स्वच्छतेसाठी शिक्षक छतावर चढले

धारूर : तालुक्यातील सोनीमोहा येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताला अचानक गळती लागल्याचे पाहून शाळेचे शिक्षक तानाजी लिसुने यांनी शाळेच्या छतावर जाऊन स्वतः शाळेच्या छताची साफसफाई व स्वच्छता केली. त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.

कोरोनामुळे गेल्या १६ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. फक्त शिक्षक व मुख्याध्यापक शाळेत येतात. त्यामुळे शाळांची दीड वर्षातील परिस्थिती लक्षात येत नाही. बुधवारी सकाळी धारूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच होती. सोनीमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तानाजी लासुने हे शाळेत गेले असता शाळेचे छत, कार्यालय व इतर काही ठिकाणी गळती लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब शाळा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्यांचे लक्षात आले. तत्काळ या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी थेट ते शाळेच्या छतावर चढले. ज्या ज्या ठिकाणी छताला गळती लागली आहे, ते पाहून छतावरील साचलेली घाण स्वतः हातात खराटा घेऊन त्यांनी साफ केली. सर्व सुरक्षिततेचा विचार करून पूर्ण छत स्वच्छ केले. या स्वच्छतेमुळे पाणी साचून होणारी गळती थांबली.

140721\img-20210714-wa0119.jpg

जि प प्राथमीक शाळा सोनीमोहा येथे शाळेच्या छताची स्वच्छता करताना

Web Title: The teacher climbed to the roof to clean the school