केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी ४० जणांना चावा, नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:20 IST2026-04-15T12:18:13+5:302026-04-15T12:20:15+5:30

कुत्र्याचा दिसेल त्याला घेतला चावा; संतप्त नागरिकांचा नगर पंचायतीच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा

Stray Dog Menace in Kaij: Rabid Dog Bites 40 People in Two Hours; High Alert in Town. | केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी ४० जणांना चावा, नागरिकांमध्ये भीती

केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच दिवशी ४० जणांना चावा, नागरिकांमध्ये भीती

केज : येथील नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० नागरिकांना चावा घेतल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी या कुत्र्याने बसस्थानक परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. दिसेल त्या व्यक्तीला हा कुत्रा चावा घेत होता. बसस्थानक परिसरासह मंगळवारपेठ, अजिजपुरा, भीमनगर, रोजा मोहल्ला भागातही या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन धुमाकूळ घातला. एक ते दोन तासांत तब्बल ४० जणांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे खळबळ उडाली. कुत्रा चावल्याने जखमी रुग्णांची येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी सोमवारी रांग लागली होती.

जखमी रुग्णांवर उपचार
सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ४० जणांना चावा घेतला होता. या सर्व जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन दिल्याचे व दहा रुग्णांना कुत्र्याने जास्त ठिकाणी चावा घेतल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कार्यालयात मोकाट कुत्रे सोडणार..!
केज शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर पंचायतीने करण्याची मागणी केज विकास संघर्ष समितीने केली आहे. याची दखल त्यांनी न घेतल्यास नगर पंचायतीच्या कार्यालयात शहरातील सर्व मोकाट कुत्रे आणून सोडण्याचा इशारा समितीचे तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांनी दिला.

कुत्रा चावल्यास काय करावे?
तात्काळ जखम धुवा: कुत्रा चावल्यानंतर ती जागा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान १० ते १५ मिनिटे स्वच्छ धुवावी.
घरगुती उपचार टाळा: जखमेवर मिरची, हळद किंवा तेल लावणे टाळावे.
रेबीज इंजेक्शन: वेळ न घालवता २४ तासांच्या आत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.
निरिक्षण: चावा घेणाऱ्या कुत्र्यावर १० दिवस लक्ष ठेवावे.

Web Title : केज में पागल कुत्ते का आतंक, 40 लोगों को काटा; नागरिकों में दहशत

Web Summary : केज में एक पागल कुत्ते ने 40 लोगों को काटा, जिससे दहशत फैल गई। पीड़ितों ने अस्पताल में रेबीज का इलाज कराया। आवारा कुत्तों पर नगरपालिका की निष्क्रियता से निराश होकर, एक स्थानीय समूह ने उन्हें नगरपालिका कार्यालय में छोड़ने की धमकी दी।

Web Title : Mad Dog Terrorizes Kej, Bites 40; Fear Grips Residents

Web Summary : A rabid dog in Kej bit 40 people, causing widespread panic. Victims sought rabies treatment at the local hospital. Frustrated by the municipality's inaction regarding stray dogs, a local group threatened to release them in the municipal office.