शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

बसची गती आणि लोकेशनही कळणार प्रवासादरम्यान ब्रेकडाऊन होणाऱ्या बस शोधणे सुलभ होणार आहे. बस कुठे व का उभी आहे, ...

बसची गती आणि लोकेशनही कळणार

प्रवासादरम्यान ब्रेकडाऊन होणाऱ्या बस शोधणे सुलभ होणार आहे. बस कुठे व का उभी आहे, तसेच बसची गती किती आहे, ओव्हर स्पीड आहे? का, याची माहिती या प्रणालीअंतर्गत अधिकाऱ्यांना बसल्या जागी मिळणार आहे. त्यामुळे लागणाऱ्या गरजेची पूर्तता करणे सुलभ होणार आहे. बस स्थानकात लागले मोठे स्क्रीन

रापमच्या बीड विभागात आठ मोठे बस स्थानक आहेत. प्रत्येक बस स्थानकावर ४२ इंची स्क्रीन लावण्यात आले असून पॅसेंजर इन्फॉरमेशन सिस्टीमद्वारे प्रवाशांना ते प्रतीक्षा करीत असलेल्या बसची माहिती कळू शकणार आहे. या स्क्रीनवर प्रत्येक गाडी सध्या कुठल्या ठिकाणी आहे, स्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती मिळणार आहे.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

बस विनाकारण लेट होत असेल, वाहक-चालकाकडून कोठे टाइमपास केला जात असेल, तर लगेच कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. गाड्यांना वेळ पाळणेही सोपे होईल. तसेच बसची ओव्हरस्पीड संबंधित निरीक्षकांना या प्रणालीतून समजणार असल्याने चालकांनाही अनुपालन करावे लागणार आहे.

-------

प्रवाशांना ॲपवर कळणार सर्व माहिती

रापमच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ॲप विकसित होत आहे. याद्वारे प्रवाशाला कोठून कोठे जायचे यासाठी त्या मार्गावरून काेणती बस कधी जाणार, बसचे चालक, वाहकांचे मोबाइल क्रमांक, बॅच नंबर आदी लोकेशन मायक्रो मॅपप्रमाणे उपलब्ध होणार आहे.

---------

व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीममुळे प्रवाशांना बस ट्रॅक करता येणार आहे. त्यावरून किती वेळ लागणार हे समजू शकेल. प्रवासाचे नियोजन करता येईल. तासनतास ताटकळत थांबायची गरज पडणार नाही. या प्रणालीमुळे प्रवाशांना सुविधा होणार आहे.

-संदीप पडवळ, विभागीय वाहतूक अधिकारी, बीड.

---------