वडवणीत राष्ट्रवादीकडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:57+5:302021-07-07T04:41:57+5:30

वडवणी : देशात इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई ...

Stop the road from the NCP in Wadwani | वडवणीत राष्ट्रवादीकडून रास्ता रोको

वडवणीत राष्ट्रवादीकडून रास्ता रोको

वडवणी : देशात इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर वाढवत शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. या विरोधात तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, सभापती बाजार समिती दिनेश मस्के, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सांवत, नगरसेवक संभाजी शिंदे, सभापती पंचायत समिती बळीराम आजबे भास्कर उजगरे, विश्वास आगे, संतोष पवार, असल्म कुरेशी, धनजय जाधव, भिमराव उजगरे, विठ्ठल भुजबळ, नगरसेवक सतिष बडे, सरपंच संदीपान खळगे, व्यंकट लंगे, नारायण शेळके, संतोष डावकर, श्रीराम मुंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

...

..तर पुन्हा आंदोलनाचा इशारा

आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती बांधकाम जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तत्काळ दरवाढ कमी न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.

...

Web Title: Stop the road from the NCP in Wadwani