वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:22+5:302021-07-04T04:23:22+5:30

माजलगाव : जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊनचे निर्देश आहेत. या कालावधीत ...

Shops open in weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी

वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी

माजलगाव : जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊनचे निर्देश आहेत. या कालावधीत बिनधास्तपणे दुकाने उघड्या ठेवून मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी येथील चार दुकानांवर शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी कारवाया केल्या.

जिल्ह्यात शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता वीकेंड लॉकडाऊन जारी आहे. असे असतानाही माजलगाव शहरात येथील सर्व व्यापारी बिनधास्तपणे आपल्या दुकानात चालू ठेवत आहेत. नियम पाळण्याच्या सूचना पोलीस वारंवार देत आहेत. तरीही अनेक दुकाने उघडी ठेवली जात आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना दुकाने उघडली असल्याचे दिसल्यानंतर कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, गणेश तळेकर, श्रीराम पवार, गणेश ठेंगल यांच्यासह पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते.

सदाशिव ज्ञानोबा कळसकर व श्रीराम ज्ञानोबा कळसकर यांच्या मालकीचे आनंद कलेक्शन , मोमीन मुजीब अब्दुल नजीर व शेख सद्दाम यासीन यांच्या मालकीचे नॉवेल्टी ड्रेसेस, सुनील भावसार यांच्या मालकीचे पायल क्लॉथ सेंटर व यशराज शुज कलेक्शनचे मालक उद्धव भाऊसाहेब गोंडे यांच्यावर कारवाई केली. कोरोनाच्या नियमांचा भंग करणे, दुकानात गर्दी जमविणे, मास्क न वापरणे या कारणांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Shops open in weekend lockdown