शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या ...

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब पीक परिसंवादात, महाराष्ट्र शासनाचा ‘डाळिंब रत्न’ पुरस्कारप्राप्त बाबासाहेब गोरे व आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलक संस्थेचे कांतीलाल चाणोदिया व विश्वस्त उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.एन.एस.राठी, उपप्राचार्य डॉ.जे. एम. भंडारी, पंचायत समिती सदस्य परमेश्वर शेळके, सरपंच बबनराव तळेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. विशाल वैद्य यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प, सुधारित बियाणे तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियोजनाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी यांनी वसुंधरा संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मास्क व गुलाब पुष्प देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. चंद्रशेखर तळेकर, प्रा. डॉ. रमेश आबदार, अशोक खाडे, प्रा.गवळी एन.टी, प्रा.डॉ. जाधवर पी. बी., प्रा. हासे एस.आर व प्रा.डॉ. शिंदे एस.एम. यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम जाधव यांनी केले. सुनील खाडे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पर्यावरणपूरक उपक्रम महाविद्यालयाने अंगीकृत करण्यासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, कार्याध्यक्ष योगेशकुमार भंडारी, सचिव हेमंतकुमार पोखरणा, उपाध्यक्ष रमेशलाल गुगळे व अनिलकुमार झाडमुथ्था, मंत्री बिपीनकुमार भंडारी, विनोद बलदोटा, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त व कार्यकारी मंडळांनी प्रोत्साहन दिले.

मृदा, जल परीक्षण काळाची गरज

यावेळी बाबासाहेब गोरे यांनी शास्त्रीय पद्धतीने डाळिंब पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून सेंद्रिय औषधांचे उपयोग सांगितले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. मृदा व जल परीक्षण काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बाबूलाल भंडारी यांनी श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ येत्या तीन वर्षात शतक महोत्सवात पदार्पण करणारी जिल्ह्यातील एकमेव जैन अल्पसंख्यांक संस्था असल्याचे सांगितले.