शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांपाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:34 IST

आशा सेविकांपाठोपाठ आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारीही सोमवारपासून संपावर गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आशा सेविकांपाठोपाठ आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारीही सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. सध्या विविध मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, हे कर्मचारी संपावर गेल्यावर मोहिमेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतलेला आहे.सध्या बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर दरम्यान, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरूग्ण शोध मोहिम असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान, कुष्ठरूग्ण शोध अभियान संयुक्तपणे राबविले जात आहे. आगोदरच आशासेविका संपावर गेल्याने या मोहिमेत संथगती आली होती. तर आता एनएचएमचे कर्मचारीही संपावर गेल्याने या मोहिमेवर मोठा परिणाम झाला आहे. बीड जिल्ह्यात ७०० च्या जवळपास तर राज्यात १८ हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर असून ते संपावर गेले आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या कर्मचा-यांनी घेतला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे हे धरणे आंदोलन होत आहे. राज्यभरातून अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.वैद्यकीय अधिका-यांची सुटी रद्दआरोग्य विभागातर्फे सध्या विविध मोहीम, अभियान राबविले जात आहेत. या अभियानावर परिणाम होऊ नये, यासाठी ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची मंगळवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सार्वजनिक सुटी रद्द केली आहे. तसे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी काढले आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनHealthआरोग्यEmployeeकर्मचारी