शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 20:00 IST

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेतील लेखापाल अधिकाऱ्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बीड जिल्हा गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीवरुन राज्यभर चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. तर दुसरीकडे सतीश भोसले याने केलेल्या मारहणीचे व्हिडीओ व्हायरल झाले. सतीश भोसले याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे. भोसले याचे भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासोबत फोटो व्हायरल झाले. दरम्यान, काही दिवसापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या प्रकरणी बीड नगरपरिषदेतील लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगरपरिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली. पगारे यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. 

“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरुन पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला होता, असे आरोपात म्हटले आहे. क्षीरसागर यांच्याविरोधात कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

फिर्यादीमध्ये काय आहे?

गणेश तुळशीराम पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी पगारे गणेश तुळशिराम (वय ५७) व्यवसाय नोकरी, रा.स्नेहनगर बीड येथील रहिवाशी असून जातीने अनुसूचित जाती पैकी महार आहे. मी बीड नगर परिषदेमध्ये लेखापाल पदावर कार्यकरत आहे. आज 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.14 वाजता तीन मिसकॉल मा. आमदार साहेबांचे आले, पण माझा फोन सायलेंट मोडवर होता.

यानंतर आमच्या घरी  चौरे नामक आमदार क्षीरसागर यांचे स्वीय सहायक आलेले होते व त्यांचे सोबत दूसरे कोण होते त्यांना मी ओळखत नाही. मग मी चौरे नां विचारले काय झाले तर ते म्हणाले आमदार साहेब बोलणार आहेत. मी म्हणालो मी माझ्या फोनवरुन बोलतो तर ते म्हणाले नाही माझ्या फोनवरच बोला. यावेळी मी फोन घेतला तर पुढून आमदार साहेब मला म्हणाले की, कारे नुसता गोड गोड बोलतो असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, आता मी बीडला आल्यावर लवकर माझ्याकडे यायचं असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी माझ्यावर वार करण्याची भाषा केली, असंही त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.   

टॅग्स :Sandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेस