शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'मराठी'ने ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य बदललं; कुसुमाग्रज-गुलजारांच्या कवितेवर मिळणार पीएचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:30 IST

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष: कोण आहे भारत सोळंके? ज्याच्या संघर्षावर पुण्याच्या FTII ने बनवला लघुपट; वाचा सविस्तर

- दिनेश लिंबेकर
माजलगाव (बीड):
सलग १० वर्षे ट्रक ड्रायव्हर म्हणून रस्त्यावर चाकं फिरवणारा एक तरुण, आज मराठीसाहित्यात क्रांती घडवत आहे. बीड जिल्ह्यातील सादोळा येथील भारत सोळंके याने मराठी भाषेच्या प्रेमापोटी ट्रकच्या कॅबीनमधून थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडीपर्यंत मजल मारली आहे. 'मराठी राजभाषा गौरव दिना'निमित्त भारतचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हॉटेलमधील काम ते ट्रक ड्रायव्हर
भारतचे कुटुंब अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंब. वडिलांनी शेती विकल्याने कुटुंबाची जबाबदारी १० वीत असतानाच भारतवर पडली. कुटुंबासाठी त्याने हॉटेल, पानटपरी आणि बर्फ गोळ्याचा गाडा चालवला. पुढे उपजिविकेसाठी तो ट्रक चालक बनला. मात्र, या खडतर प्रवासात त्याने आपल्यातील 'कवी' जिवंत ठेवला होता.

ट्रकच्या कॅबीनमध्ये पुस्तकांचे व्यसन
ट्रक लाईनमध्ये व्यसनांची कमतरता नसते, पण भारतला पुस्तकांचे व्यसन जडले होते. दिवसभर ट्रक चालवल्यानंतर रात्री भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' वाचल्याशिवाय त्याला झोप येत नसे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ट्रक नेताना नदीकाठी बसून त्याने आजवर ३०० हून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्याच्या या विलक्षण प्रवासावर पुण्याच्या एफटीआयआय (FTII) संस्थेने १५ मिनिटांचा लघुपटही तयार केला आहे.

आईसाठी ट्रक विकून गाठले पुणे
उच्च शिक्षणाची ओढ भारतला स्वस्थ बसू देत नव्हती. २०१७ मध्ये त्याने स्वतःचा ट्रक विकून आलेले २ लाख रुपये आईच्या नावे बँकेत जमा केले, जेणेकरून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.ए. पूर्ण केले. आता त्याने 'कुसुमाग्रज व गुलजार यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास' या विषयावर आपला पीएचडी प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सादर केला आहे. लवकरच भारतच्या नावापुढे 'डॉक्टर' ही पदवी लागणार असून, ट्रक ड्रायव्हर ते संशोधक हा त्याचा प्रवास मराठी भाषेच्या समृद्धीचे एक जिवंत उदाहरण बनला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Truck driver transforms life through Marathi, pursues PhD in poetry.

Web Summary : Bharat Solanke, a former truck driver, fueled by his love for Marathi, is pursuing a PhD comparing Kusumagraj and Gulzar's poetry. He sold his truck to fund his education after working various jobs, showcasing dedication to literature.
टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनBeedबीडmarathiमराठीliteratureसाहित्य