शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

खासगी दवाखान्याकडे धाव पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात ऐन कोरोना आपत्ती काळात प्रसूतीतज्ज्ञ व ...

खासगी दवाखान्याकडे धाव

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात ऐन कोरोना आपत्ती काळात प्रसूतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णालयात ५० टक्के महिलांनी पाठ फिरवत खासगी दवाखान्याची वाट धरली, तर सिझर करण्याची वेळ आल्याने १७० महिलांना इतरत्र रेफर करण्याची वेळ आली. असे असतानाही वरिष्ठांना याचे काही देणे-घेणे राहिले नाही.

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मागील दोन वर्षांच्या काळात चांगल्या प्रकारे रुग्णांना सुविधा मिळत होत्या. यामुळे दररोज ४००-५०० ओपीडी होत असत. या ग्रामीण रुग्णालयात दर महिन्याला १५० ते २०० प्रसूती होत असत. यामुळे हे रुग्णालय २-३ वर्षांपूर्वी नावारूपाला आले होते, परंतु मागील एक वर्षांपासून डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. प्रसूतीतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्यामुळे या ठिकाणी ऐन कोरोनाकाळात प्रसूतीच्या संख्येत मोठी घट झाली.

१ एप्रिलपासून ३१ डिसेंबर, २०२० या आठ महिन्यांत ९८च्या सरासरीने केवळ ७८६ प्रसूतींची नोंद झाली. त्यापैकी ७५८ महिलांच्या प्रसूती झाल्या असून, केवळ २८ सिझर करण्यात आले. हे झालेले सिझर एप्रिल ते ऑगस्टदरम्यान झाले होते. ऑगस्टनंतर एकही सिझर या ठिकाणी करण्यात आले नाही.

सिझर करण्याची वेळ आल्याने जवळपास मागील आठ महिन्यांत

सिझर करण्याची वेळ आलेल्या १७० महिलांना या रुग्णालयातून इतरत्र रेफर करण्यात आले. डॉक्टरांच्या अभावामुळे या ठिकाणी सध्या केवळ शंभर ते दीडशेच ओपीडी होत असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या काळात या ठिकाणी सुविधा मिळत नसल्याने, मोठ्या प्रमाणावर महिलांना प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठ फिरवत, खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असताना, वरिष्ठांना याचे काहीच सोयरसुतक राहिलेले नाही.

या रुग्णालयाला मागील काही महिन्यांपासून प्रसूतीतज्ज्ञ नसल्यामुळे या ठिकाणी सिझर करण्यात आले नाही. प्रसूतीतज्ज्ञांची आम्ही अनेक वेळा वरिष्ठांकडे मागणी केली आहे. लवकरच डॉक्टर मिळतील, त्यानंतर सर्व सुरळीत होईल.

-डॉ.सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय