मजुरांना काम मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:04+5:302021-07-04T04:23:04+5:30

वाहनधारक त्रस्त अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा. ...

The laborers could not find work | मजुरांना काम मिळेना

मजुरांना काम मिळेना

वाहनधारक त्रस्त

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा. राडी ते मुडेगाव. अशा अनेक रस्त्यावर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालविताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

पाण्याची नासाडी

अंबाजोगाई : शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

मास्क दिसेना

बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

हातपंपात बिघाड

बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.

Web Title: The laborers could not find work