शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नगर-बीड-परळी रेल्वेसाठी दीडशे कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तीनशे अठ्ठेचाळीस कोटींपैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या ...

बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तीनशे अठ्ठेचाळीस कोटींपैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रेल्वे मार्गासंदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीत निधी मिळवून देण्यासाठी केंद्राकडे खासदार मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. निधी मिळाल्यानंतर खा. मुंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेल्वे व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला गती देण्यासंदर्भात सूचना केल्या.

बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. रेल्वेमार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला. भूसंपादन, रेल्वेमार्गात येणारे विजेच्या खांब आणि झाडांचा अडथळा दूर करण्यावरदेखील त्यांनी चर्चा केली. दरम्यान भूसंपादनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे विभागाने त्या त्या क्षेत्रात कॅम्प घ्यावा व भूसंपादनाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचनादेखील खा. मुंडे यांनी यावेळी केल्या. भूसंपादन आणि प्रकल्पातील इतर अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा दर महिन्याला आढावा आपल्याला सादर करावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, नामदेव टिळेकर, नम्रता चाटे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.