शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

७३ वर्षीय आजोबांसह पाच जणांनी केली कोरोनावर केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

योग्य औषधोपचाराने कोरोनाला हरवता येते. याचे उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील पठाण कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे. कुटुंबातील ...

योग्य औषधोपचाराने कोरोनाला हरवता येते. याचे उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील पठाण कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे. कुटुंबातील पाच जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्याबद्दल जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर रविवारी पठाण कुटुंबीयांचा त्यांच्या घरी जाऊन एकत्रित सत्कार केला.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन, मानवलोक, ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने श्री जयकिसान महाविद्यालयात उभारलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दररोज योगाचे धडे, योग्य औषधोपचार, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा दिला जात आहे. त्यामुळे बाधित रुग्ण हे कोरोनावर मात करून लवकर बरे होत आहेत.

पाटोदा (ममदापूर) येथील पठाण कुटुंबात २० दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. सर्वप्रथम आजोबा बाधित झाल्याने हळूहळू संपूर्ण कुटुंबच बाधित झाले होते; पण न घाबरता सर्वांनी योग्यवेळी कोरोनाच्या चाचण्या केल्या. यात वयोवृद्ध महेबूबखान पठाण (७३) वर्षीय आजोबा, त्यांचा मुलगा बापूखान (४६), सूनबाई बिस्मील्लाबी ( ४४), नातू अमजद (२४), नातू समीर (२२) असे एकूण पाच जण पॉझिटिव्ह निघाले. आजोबांना जास्त त्रास नसला तरी त्यांचे वय पाहता त्यांना आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भारत नागरे, डॉ. अजय ठोंबरे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, डॉ. व्यंकट बेंबडे, डॉ. फड, डॉ. गायत्री ढमाले, परिचारिका कावरे, ढाकणे, कराड, देशमुख, मुंडे, जगदाळे, शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत, बालाजी वाघमारे, रवी सरवदे, अजित बनसोडे यांच्या टीमने आजोबा व सर्व कुटुंबीयांवर यशस्वी उपचार केले. हे कोविड सेंटर एक ‘हॅप्पी होम’ असल्याची प्रतिक्रिया देताना पठाण कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

वेळेवर योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर कोरोना १०० टक्के बरा होतो. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. कोरोनाबाधितांचा तिरस्कार करू नका, तर यातून लवकर बरे होण्यासाठी रुग्णांना धीर द्यावा.

- बिस्मिल्लाबी पठाण

कोरोनाला घाबरू नका. तर सकारात्मक विचार ठेवा. नियमित व्यायाम करा. योग्य आहार, औषधोपचार घेतल्यास कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करता येते. आता आम्ही कुटुंबातील सर्वच जण ठणठणीत बरे झालो आहोत.

- अमजद बापूखान पठाण

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला मानसिक आधार, धीर द्या. डॉक्टरांनी धीर देत केलेले उपचार व प्रबोधनामुळे रुग्णालयात कसलीही अडचण आली नाही.

- महेबूबखान रहेमतखान पठाण

मागील काही दिवसांत आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केलेले रुग्ण तणावमुक्त वातावरणामुळे ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पॉझिटिव्ह विचाराच कोरोनाला हरवू शकतात. ग्रामीण भागातील जनतेने न घाबरता कोरोनाला सामोरे जावे.

-राजेसाहेब देशमुख, जि.प. सदस्य, बीड.)

===Photopath===

310521\31bed_1_31052021_14.jpg