शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊनच शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरविण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पाऊस व हवामानाची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे.

यापुढील काळात शेती ही हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असे हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथे सोमवारी ग्रामस्थांनी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.डख बोलत होते. संपूर्ण देशात पाऊस पडत असतो. परंतु आपल्या भागात पाऊस नक्की कधी येणार आहे याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना माहिती असायला हवी. त्यामुळे शेती करताना पेरणी वेळेवर करून शेतीच्या कामासाठी योग्य नियोजन करता येते. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. त्यामुळे शेती करताना काही ठोकताळे असतात. त्याचा वापर करून शेती करावी. यापुढील काळात प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाच झाडे लावावीत. हवामान बदलामुळे प्रत्येक वर्षी तापमानात कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे बदल व त्याचे परिणाम हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर होत असतात. मोसमी वारे, मान्सूनचा पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, याविषयी शेतकऱ्यांना डख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. सुनील गाडे, सरपंच मधुकर गिऱ्हे, विजय शेळके, सुनील गिऱ्हे, माणिक सरोदे, दादासाहेब गाडे, शरद कुमखले, महादेव सोनवणे, मनोज सातपुते, रघुनाथ कर्डिले, भाऊसाहेब गाडे यांच्यासह गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....

मी तीन वर्षांपासून पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाचा सखोल अभ्यास केला. आतापर्यंत त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज निश्चितच चुकलेला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या अंदाजाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले आहे.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

060721\img-20210706-wa0361_14.jpg