जायकवाडीचे पाणी डिग्रसच्या गोदापात्रात पोहोंचल्याने शेतकरी आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:44 IST2019-08-22T17:38:47+5:302019-08-22T17:44:58+5:30

परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना दिलासा

Farmers are happy that the water of Jayakwadi has reached the godawari besin of Digras | जायकवाडीचे पाणी डिग्रसच्या गोदापात्रात पोहोंचल्याने शेतकरी आनंदी

जायकवाडीचे पाणी डिग्रसच्या गोदापात्रात पोहोंचल्याने शेतकरी आनंदी

ठळक मुद्देशेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

परळी (बीड ) : जायकवाडी धरणाचेपाणी गुरुवारी सकाळी डिग्रस येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. मागील 2 वर्षापासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. 

परळी तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या चार गावातून गोदावरी नदी जाते. पैठण येथील जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी 6.45 वाजता परळी तालुक्यातील डीग्रस या गावी पोहचले आहे. यानंतर पोहनेर ,तेलसमुख, व बोरखेड  या गावातून सोनपेठ तालुक्यातील विटा व  गंगाखेड वरून नांदेडला जाते. यामुळे परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांचा आणि परिसरातील 15 ते 20 गावातील शेतीसाठीचा आणि पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

गोदावरी नदीवरील बंधारा अपूर्ण
तालुक्यातील पोहनेर येथिल गोदावरी वरील बंधारा 15 वर्षपूर्वी मंजूर करण्यात आला आहे, परंतु त्याचे संपुर्ण काम झालेले नाही, वास्तविक पाहता नाशिक ते तेलंगणा बॉर्डर पर्यंत गोदावरीच्या पात्रात एकूण छोटे सरासरी 15 ते 20 बंधारे 2005 साली मंजूर करण्यात आले होते. त्यातील पोहनेर/तारगव्हान हा एकमेव बंधारा अपुर्ण आहे. हा बंधारा झाला असता तर आज 15 हजार हेक्टरच्या वर जमीन सिंचनाखाली आली असती आणि ढालेगाव ते पोहनेर 20 किमी पाणी गोदावरी मध्ये अडले असते. पात्राच्या दोन्ही बाजूचे गाव मिळून परिसरातील 50 ते 60 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. परंतु, पाणी पोहनेर ला येऊनही पुढे वाहून जाणार आहे अशी कैफियत पोहनेरचे अ‍ॅड. रमेश साखरे यांनी मांडली. निधी नसल्याने हे काम अपूर्ण असल्याचे हिवरा गावचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी म्हटले आहे

Web Title: Farmers are happy that the water of Jayakwadi has reached the godawari besin of Digras