शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून ६१९ शेतकऱ्यांना ४ कोटी १३ लाखांचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ मेअखेर खरीप हंगामात ६१९ सभासदांना ४ कोटी १३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप ...

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ मेअखेर खरीप हंगामात ६१९ सभासदांना ४ कोटी १३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. बीड जिल्हा बँकेला २०२१-२२ च्या खरीप हंगामात २०८ कोटी रुपये, तर रब्बी हंगामात ५२ कोटी असे २६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासनाने दिलेले खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा बँक पूर्ण करणार असून, पीक कर्जासाठी सातबारा व इतर कागदपत्रांसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिली.

बँकेचे नूतन प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणून अविनाश पाठक, राज्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहायक निबंधक अशोक कदम आणि ॲड. अशोक कवडे यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली आहे. खरीप हंगामात पीककर्ज वाटपासह बँकिंग प्रणालीबाबत धोरणात्मक निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतले आहेत.

यापुढे बँकिंग प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून शेतकरी सभासद व नवीन ठेवीदारांना डेबिट कार्ड दिले जाणार आहे. पीककर्जासोबत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तलाठ्याचा हेलपाटा वाचणार

जिल्हा बँकेने जमाबंदी आयुक्तालयाशी करार करून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी, सातबारा व आठ अ संगणकीय प्रणालीद्वारे तालुका शाखा स्तरावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता डिक्लेरेशन म्हणजेच इ-करारपत्रावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची गरज लागणार नसल्याच्या सूचना सर्व शाखांना दिल्या आहेत.

ठेवींसाठी आवाहन

जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिकारी समितीने ठेवीधारकांना बँकेत ठेवी ठेवण्याचे आवाहन केले असून, बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीला विमासंरक्षण असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी समितीच्या अध्यक्षांनी दिली. नवीन ठेवीदारांना बँक बँकिंग व्यवहारासाठी डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

कर्जदारांचा डाटा सिबिलवर

कर्जाची नोंद सिबिलवर घेण्याचा निर्णयसुद्धा प्राधिकृत अधिकारी समितीने घेतल्याची माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिली. त्यानुसार जिल्हा बँकेकडून कर्जधारकांचा डाटा अपलोड करण्यात येणार असून, कर्जदारांनी सिबिल क्रेडिट खराब होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी थकीत कर्जाचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.