शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील पीकविमा भरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पीकविमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी अंतिम तारीख ही १५ जुलै आहे.

यावर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ९१ हेक्टर इतके आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, कांदा, बाजरी, मका, खरीप ज्वारी, भुईमूग अशा प्रकारची पिके घेतली जातात. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरलेले न उगवणे, हवामानातील बदलामुळे झालेले नुकसान, काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक आपत्ती इत्यादी बाबींकरिता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, यासाठी गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राद्वारे व बँकेमार्फत योजनेत सहभागी होता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रतिकूल परिस्थितीत पिकांना संरक्षण मिळवून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

.... पीकविमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, शेतजमिनीचा ७,१२ उतारा, स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यायचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्यांचा करारनामा देणे आवश्यक आहे. तसेच ही योजना ऐच्छिक असल्याने कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी विहीत मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस तसे लेखी कळविणे अनिवार्य आहे.

पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा शेतकरी दरवर्षी भरतात. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून पीकविमा भरावा. आपले सरकारवर विमा हप्त्याव्यतिरिक्त जादा रक्कम देण्याची आवश्यकता नाही. तसे केल्यास त्या केंद्राविरूद्ध तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

....

खरीप हंगामासाठी संरक्षित रक्कम, शेतकरी विमा हप्ता

पीकविमा संरक्षित रक्क्म प्रतिहेक्टरी शेतकरी विमा हप्ता प्रतिहेक्टर

सोयाबीन ४५००० ९०० कापूस ४५००० २२५० कांदा ६५००० ३२५० बाजरी २२००० ४४० मका ३०००० ६०० तूर ३५००० ७०० मूग २०००० ४०० उडीद २०००० ४०० भुईमूग ४५००० ९०० खरीप ज्वारी २५००० ५००