कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:20+5:302021-06-18T04:24:20+5:30

वडवणी : कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना ...

Covid employees should be accommodated in permanent service | कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे

कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे

वडवणी : कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या भीतीदायक वातावरणात अनेक गोरगरीब कुटुंबातील मुला - मुलींनी डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉयच्या भूमिकेतून आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता रुग्णसेवा केली. रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली. अलीकडच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटर बंद केली जात आहेत. कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले आहे. सेवेतून कमी केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांना आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कायम सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना वडवणीतील कर्मचारी लहू खारगे, अमोल वाघ, प्रशांत सदरे, किरण डिगे, साहिल शिंदे, सोहेल शेख आदी उपस्थित होते. निवेदनावर डॉ. अर्चना स्वामी, डॉ. राहुल शिंदे, डॉ. सोनाली राऊत, अमर बडे, स्टाफ नर्स सारिका खडके, अनिता पाटील, उषा निर्मळ, अलका नागरगोजे, अश्विनी खोटे, सुनीता तोगे, डाटाएंट्री ऑपरेटर मंगेश प्रभाळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नारायण पवार, वॉर्डबॉय कल्पना दिवटे, शशिकांत चिलगर, अहमद शेख, आकाश तोरे, शुभम अंबुरे, बाबू गुरसाली आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Covid employees should be accommodated in permanent service